ह्या आधीची खाद्य भ्रमंती ..
इथे इथे इथे आणि
इथे पहा
उन्हाळ्यात सर्वांची आवडती "सखी " म्हणजे "मस्तानी" ... हिचं नाव लहान मोठ्यांच्या मनात येतं ते तिच्या गोडव्या मुळे ... घट्ट मिल्क शेक वर तरंगणारया आईस्क्रीम गोळ्या च्या थंडाव्या मुळे आणि त्या नंतर पोटात मिळणार्या शांतते मुळे ! प्रत्येक गावात आईस्क्रीम / मस्तानी खाण्या साठी एक विशेष ठिकाण नक्की आहे .. असतं... भारतात कुठे हि जा... अगदी विदर्भातल्या रण-रणत्या गावापासून ते खालच्या कोकणातल्या एखाद्या लहानशा बाजारा च्या ठिकाणा पर्यंत ..
पुण्याचं हि असंच "मस्तानी" शी नातं आहे.
खरं तर पुण्यात पहिली "मस्तानी" सुरु केली ती खजिना विहिरी जवळच्या- स्काउट ग्राउंड समोरील
बुवा आईस्क्रीम वाल्यांनी ...तेव्हाची मस्तानी हि खर्या दुधात पिस्ता, चोकोलेट , अंबा किंवा गुलकंद सेंट घातलेलं दुध .. त्या वर .. पॉट मध्ये तयार केलेल्या मलईदार आईस्क्रीम चा गोळा ...एका मोठ्या ग्लास मध्ये मोठा उंच चमचा घालून मिळत असे .. ( पुढे काही लोकं ह्या चमच्याला "अमिताभ" म्हणत )
पुढे
कावरे कोल्ड्रिंक्स (गणपती चौक आणि तुळशीबाग ) आणि इतर आईस्क्रीम वाल्यांनी हि मस्तानी विकायला सुरवात केली ... लहानपणी मी पेयलेल्या मस्तानी तील मिल्कशेक (आताच्या मनाने ) पातळ असायचा ... तो पिता येयचा. आजकाल तो बराच "पिठूळ लेला " , घट्ट असतो ..पिता येत नाही .. खावा लागतो ! ( बहुतेक पावडर च्या दुधा मुळे असेल )
आताचे आघाडीचे '
मस्तानी वाले " म्हणजे
कोन्ढाळकर (ओरीजिनल घट्ट मस्तानी बनवणारे) ,
सुजाता मस्तानी ( हे पण कोन्ढाळकरान पैकीच ) ... सुजाता मस्तानी च्या आता पुण्यात अनेक ठिकाणी शाखा सुरु झाल्या आहेत . ह्यांची सुरवातिची दुकानं निंबाळकर तालीम चौकात अजून हि चालू आहेत.
अमृत कोकम हे अनेक ठिकाणी प्यायला मिळते ..पण "
गणू शिंदे" यांचे
स्पेशल अमृत कोकम हे एक विशेष चवदार पेय आहे.... पूर्वी स्पेशल अमृत कोकम मध्ये लिम्का असायचा आता त्या ऐवेजी लेमन किंवा लेमोनेड घालतात ...लक्ष्मी रोड वरील ट्राफिक सहन करत
गणू शिंदे कोल्ड्रिंक हाउस मध्ये केवळ "स्पेशल अमृत कोकम " पिण्या साठी जावं ! तिथे गेलात तर "
थंडाई " चा एखादा ग्लास हि घेयला विसरू नका !
उन्हाळयात मला अत्यंत आवडणार्या गोष्टी मध्ये
"बर्फाचा रंग बिरंगी गोळा" हे आहे .. तसं "गोळावाले" आजकाल कमीच दिसतात .. पण तो गोळा बनवताना .. बर्फाच्या लादीतून बर्फाचा किस काढताना ... तो लहान मोठ्या ग्लासातून घट्ट बसवताना .. काडी रोवताना .. त्यावर रंग ओतताना बघण्यात एक अजब मजा आहे... हैदराबाद हे शहर मला आजिबात आवडलं नाहिये पण तिथे पानांच्या दुकानात मिळणारे "
आईस गोळे " हि एकमेव आवडलेली गोष्ट !
उन्हाळयातील बाकी पेयान मध्ये ..
कलिंगडाचा रस - वर छोटे काप ,
कैरीचे गुळातले थंडगार पन्हं ,
करवंदाचे सरबत , वाळा सरबत, उसाचा थंडगार रस, थंडगार नीरा ... हे नुसते आठवले तरी सुद्धा मनाला एक प्रकारची उल्हासित करणारी शीतलता मिळते ह्यात काही नवल नाही !
सकाळी नीरा ....दुपारी लिंबू सरबत , कलिंगड रस -काप , वाळा सरबत .. अमृत कोकम ... संध्याकाळी चटकदार भेळ - पाणीपुरी ..भेळ तिखट लागल्या मुळे एकदोन ग्लास उसाचा रस ... रात्री अंबा-पिस्ता मस्तानी ... अजून काय हवं उन्हाळा आवडायला ?