आज पं विजय कोपरकर यांचा भैरव ते भैरवी हा अप्रतिम कार्यक्रम पाहण्याचा योग आला ! ह्या कार्यक्रमात न आवडण्या सारखं काहीच नाही ! संकल्पना , कलाकार , पेशकश , निवेदन सगळच अतिशय उच्च स्तरावरचं वाटलं. सर्व कलाकार गुणी, प्रतिभावंत आणि अभ्यासी वृत्तीचे जाणवतात ,संयोजन एकदम सूत्रबद्ध असं ( मिलिंद ओक , डॉ समीर कुलकर्णी , आशिष मुजुमदार ) , वादक कलाकार आणि गायक हे पूर्ण तयारी चे असे , स्वतः पंडित कोपरकर हे केवळ तीन -चार मिनटात एखादा राग पूर्ण पणे मांडतात आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध होवून जातात ... राहुल सोलापूरकर आणि पौर्णिमा मनोहर ह्यांचं निवेदन म्हणजे दुग्ध-शर्करा योग ... वादकांची मोजकी आणि सुरेख साथ हे सगळं सुरेख जमून आलं आहे . पं कोपरकरांची प्रतिभा आणि ज्ञान हे कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणा ला जाणवते..
तीन तास पटकन गेले असं वाटतं .... हा कार्यक्रम ५ तासांचा केला तरी प्रेक्षकांना तो आवडेल ..
आजचा कार्यक्रम कवी ग्रेस यांना समर्पित होता .. सर्व गुणी आणि प्रतिभावंत कलाकार एकत्र आले कि काय अप्रतिम पेशकश होऊ शकते हे भैरव ते भैरवी हा कार्यक्रम बघितल्या शिवाय कळणार नाही ...
साहित्य , कला , संगीत ह्या विषयी कण भर जरी रस असेल तर हा कार्यक्रम जरूर बघावा ...
दत्त प्रसाद रानडे आणि सायली पानसे हे गायक आपल्या उपशास्त्रीय गायनानी पं कोपरकरांना पोषक साथ करतात ...आणि टाळ्या हि घेवून जातात .... तबला (प्रसाद जोशी ) , वायोलीन्स (राजेंद्र भावे ) , ताल वाद्य , सिंथ (केदार परांजपे ) वाजवणारे कलाकार सुरेख साथ देतात आणि दाद घेवून जातात ..
मी ह्या कार्यक्रमाला ए - वन ग्रेड दिली आहे आणि फॅन झालो आहे ! "प्रत्येकाने जरूर पहावा असा कार्यक्रम" म्हणून मी शिफारस करीन ! संगीत तुम्हाला अज्जिबात कळत नसेल किंवा फार कळतं असं वाटत असेल तरी हा कार्यक्रम तुम्हाला खूप काही शिकवून जाईल .. आनंदित करेल ..आवडेल !
पुण्यात जेव्हा - जेव्हा हा कार्यक्रम असेल तेव्हा मी नक्की पाहीन हे नक्की !
आज राम नवमी ला संगीताचे दोन अप्रतिम कार्यक्रमांची भेट मिळाली : भैरव ते भैरवी (५ ते ८) आणि नंतर हृदयनाथ चा भावसरगम (८ ते १० )
2 comments:
व्हीडी, खरं तर या कार्यक्रमाला मलाही यायचे होते, आधी एकदा बरेच दिवसांपूर्वी ऐकला होता. त्या निमित्ताने समोरासमोर गाठ देखील पडली असती. कोपरकरांचा तर मी कायमचाच फॅन आहे, दोन दिवस आधीच त्यांची रेडिओकरता मुलाखत घेतली होती. असो, पुण्यात असूनदेखील योग नव्हता. पण ए-वन ग्रेड एकदम पटली...
पुढल्या वेळेला पुण्यात याल तेव्हा भेटू !There is always next time ! :)
Post a Comment