Sunday, March 18, 2012

देऊळ


देऊळ ..एकदम आवडला ..तिरकस विनोदि ..पण झोंबणारं सामाजिक सत्य अतिशय सहज रित्या दाखवणारा चित्रपट .... स्क्रिप्ट आवडली !
गिरीश कुलकर्णी च काम  आवडलं !
सोनाली कुलकर्णी  भूमिके  मध्ये पूर्ण पणे शिरल्या सारखी वाटते ,"अप्सरा आली" मधली हीच का ती मादक अप्सरा ? का तिचं हे  अस्सल गावरान रूप ? झकास झालं आहे काम !
दिलीप प्रभावळकर आता प्रत्येक भूमिकेत "प्रेडिक्टेबल" झाला आहे ! कुठल्या हि चित्रपटात दिलीप प्रभावळकर त्याच वेशात -भूमिकेत जाणवतो.
नाना पाटेकर कधी नव्हे तो मला आवडला . नेहमीचा  चीड-चीड्या, जगाला कंटाळलेला नाना "हटके " भूमिकेत लक्ष वेधून गेला !

बोचरा विनोद ...जो एक प्रकारे टीका करण्यासाठी अतिशय प्रभावी अस्त्र बनू शकतो, त्याचा सुंदर वापर दिग्दर्शक, स्क्रीन -प्ले , स्क्रिप्ट -रायटर  यांनी केला आहे !

गेल्या  दोन-तीन  दिवसात बरेच  मराठी सिनेमे बघून झाले .. शाळा , देऊळ , मुंबई-पुणे-मुंबई , फक्त लढ म्हणा, झेंडा , झकास ,तरुण तुर्क -म्हातारे अर्क , बालगंधर्व ...   देऊळ एक चांगला अनुभव वाटला !

  

4 comments:

अभिजीत said...

एक correction - नटरंग मध्ये अप्सरा झालेली सोनाली कुलकर्णी आणि देऊळ मधली सोनाली कुलकर्णी या वेगवेगळ्या आहेत. देऊळ मधली सोनाली हि दिल चाहता है, सिंघम ई. मधली आहे.

Tveedee said...

सॅरी ...घोळ झाला ...
आता "अप्सरा आली" परत एकदा निट बघतो ..चेहरा हि बघतो :)
चूक दाखवल्या बद्दल धन्यवाद.

Prashna said...

Dilip Prabhavalkar he barech senior actor aahet...Ekeri ullekh talava

Tveedee said...

एकेरी उल्लेख हा केवळ आपुलकीने आहे .. प्रेमानी आहे ... दिलीप प्रभावळकर ला दिलप्या नाही म्हणालो !
एकेरी उल्लेक सुद्धा प्रेमाने हक्काने आपण करतो .. आपण आई ला अगं आईच म्हणतो !