पुलं च्या साहित्यात , व्यक्ती आणि वल्ली ह्या पुस्तकात भेटलेली अनेक व्यक्तिचित्रे घेवून एक संहिता ( स्क्रिप्ट) लिहायला घेतली आहे.प्रायोगिक स्तरा वर आणि पुल प्रेमी "हौशी" साहित्तिक एकत्र जमून ,एक ग्रुप म्हणून असं स्क्रिप्ट लिहिण्याचा मानस आहे ..
पुलं च्या साहित्या चे अनेक प्रेमी पुण्यात आहेत.. अनेक अभ्यासक हि आहेत .. प्रत्येक व्यक्ती चित्रात एक स्वतंत्र संहिता आहे ... जर असे हौशी साहित्तिक आठवड्यातून एकदा एकत्र बसून चहाचा घोट घेत ..आपली प्रतिभा कागदावर उमटवू शकले तर फार मजा येईल. निदान सर्व पुलं साहित्य प्रेमींचा एक कट्टा तरी नक्की जमेल !
अशा प्रकार च्या विचारातून मी पुण्यातील पुल प्रेमींना एक आवाहन करत आहे ..
असा हौशी साहित्तीकांचा कट्टा पुण्यात (च !) भरू शकतो ... असा कट्टा जमवण्याची माझी इच्छा आहे . जर कोणाला अशा प्रकारच्या "गृपिझम " मध्ये भाग घेण्याची इच्छा असेल तर माझे त्यांना आग्रहाचे निमंत्रण !
ह्या पोस्त ला उत्तर म्हणून आपला अभिप्राय कळवा ... ट्विटर किंवा इमेल ने कळवले तरी चालेल.
शनिवार / रविवार /गुरुवार ह्या पेकी कुठला दिवस जमू शकेल ते हि कळवा
जर तुमचा एखादा "पुलं साहित्य प्रेमी " मित्र / मैत्रीण अश्या उपक्रमात भाग घेण्यास इच्छुक असेल तर कृपया त्यांना हि जरूर कळवा हि कळकळीची विनंती !
No comments:
Post a Comment