जीवनात काही भव्य दिव्य दिसलं तर त्यानं भारून जायचं, त्याचंच कौतुक करायचं आणि तुलनेनं जीवनातील वाईट आहे त्याकडे तितकसं लक्ष द्यायचं नाही , असा हा माझ्या स्वभावाचाच भाग आहे. म्हणजे मल्लिकार्जुन मन्सूर किंवा कुमार गांधारांचं गाणं ऐकून कि भारून जातो . या दोघान इतकच जर एखादी लहान मुलगी चांगली गायली तरीही मी भारून जाईन आणि या दोन्ही भारून जाण्यात गुणात्मक फरक काहीच नसतो . मला एकदम ते अपील होतं . मला अजूनही हे समजलं नाही कि मला आमुक आवडलं नाही , हे सांगण्यासाठी पन्नास पानं का खर्च करावी ? मला जे आवडलेलं आहे ते दुसर्याला सांगायचा मोह होतो . मला आवडलेल्या पुस्तकान बाबत मी जे काही लिहिलंय ते समीक्षेच्या स्वरुपाच नसून त्या लेखनाला दिलेली दाद अशा स्वरूपाचं आहे. समीक्षा करायची म्हटली कि काही म्हटलं तरी , त्यातले दोष दाखवण्याची जवाबदारी येते . त्याशिवाय समतोल साधला जात नाही असं समजलं जातं . मला आवडलं ते मी सांगणार. पुष्कळ लोकं म्हणतात, तुम्ही 'गुण गाईन आवडी ' चं करता . सद्गुण तेवढे दाखवता. दुर्गुणांचं काय ? आता दुर्गुणांच जे व्हायचय ते होईल . दुर्गुण आणि तो मनुष्य ते बघून घेतील . मला त्याच्यात रस नाही.
माझ्या स्वभावात चिकित्सा हा भाग नाही. स्वीकार हा भाग जास्त आहे. मला जे आनंद देईल ते आपलं वाटतं.
( पुलं च्या एका मुलाखातीतून ... )
माझ्या स्वभावात चिकित्सा हा भाग नाही. स्वीकार हा भाग जास्त आहे. मला जे आनंद देईल ते आपलं वाटतं.
( पुलं च्या एका मुलाखातीतून ... )
No comments:
Post a Comment