Wednesday, June 12, 2013

आज पुलं चा स्मृतीदिन




१२ जून हा पुलं चा स्मृतीदिन .. आज त्यांना जाऊन १३ वर्ष झाली.. ते खरं म्हणजे विस्मृतीत गेलेच नाहीत .. दररोज त्यांचं एक तरी वाक्य कुठल्या नं कुठल्या प्रसंगा वरून आठवतं .. व्यक्ती आणि वल्ली तर अजून हि भेटतात ! त्यांचा आवाज "हरितात्या", "राव साहेबां" सारखाच ऐकू येतो..सतत मराठी मना मध्ये घुमत रहातो !
मी मराठी साहित्या कडे मनापासुन वळलो ते बहुतेक पुलं च्या कथाकथना च्या कॅसेटस्  मुळे ..आपल्याला जे आसपास दिसतंय ते हा माणूस बरोब्बर शब्दात मांडतोय हे अगदी सामान्य वाचका च्या लक्षात येतं ..त्यामुळे एक प्रकारचा संवाद लवकर साधला जातो ..त्याच्या प्रतिकात्मक,रुपात्मक, तुलनात्मक  शैलीत लिहिण्याची लकब हि जवळीक निर्माण करणारी होती (Comparisons using day to day analogies ..taking the reader from known to unknown ) बहुतेक म्हणूनच माझी  भाषे शी जवळीक निर्माण झाली असावी.. मला गदिमा हे मराठीचे मार्क ट्वेन वाटतात .. तसं  पुलं च्या बाबतीत नाही .. ते वेगळे आहेत.
त्यांना "मध्यम वर्गीयांचा " लेखक असं म्हणायचे तेच बरोबर. मध्यमवर्गीय आवडी-निवडीं ची नस त्यांनी त्यांच्या लेखनात पकडलेली दिसते .. म्हणूनच ६०-७०-८० च्या दशकात तेव्हाचा  पुणे-मुंबई तील मध्यम वर्गीय हा त्यांचा "core" वाचक वर्ग होता. आज सुद्धा पुलं च्या साहित्य-कथा कथनाचा स्पर्श झाला कि मराठी तरुण, परत मराठी साहित्य -पुस्तकं वाचण्या कडे आकर्षित होत आहेत !

मला जे आज १२ जून २०१३ ला लिहावसं वाटत होतं ते  "उत्पल वी बी " यांनी अधिक सुरेख शब्दात मांडलं आहे ! त्यांच्या लेखातील निवडक काही उतारे साभार :

------

पु .ल.देशपांडे हे माझ्यासाठी एक प्रकरण होतं. 'होतं' असं चटकन लिहिलं गेलं कारण आज आता गाडीने ते स्टेशन सोडलं आहे. त्याचा मला त्रास वगैरे होत नाही. कारण वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमचं विचारविश्व वेगवेगळे आकार घेत असतं. किंबहुना तसे आकार घेतले जाणं आणि त्यानुरूप तुमच्या वाचनात बदल होणं ही एक आश्वासक गोष्ट आहे. वाचन आपल्या आवडत्या टूथपेस्टसारखं नसावंच. अनेक वर्षं एकच ब्रँड! पण पुलंच्या बाबतीत मुक्काम लांबला हे मान्य करावं लागेल. पुलप्रभाव अनेक वर्षं टिकून होता. पुलं ज्यांना पाठ असतात अशा काहींपैकी मी एक. आणि पुलंनी दर्जेदार विनोदाचा आणि सभ्यतेचा जो संस्कार केला तो माझ्यावरही झाला.
साहित्य असं घनगंभीर नाव असलेल्या प्रकाराचं महत्त्व काय? त्याचं श्रेष्ठत्व कसं ओळखायचं? चांगलं साहित्य हे आपल्याला जीवनदर्शन घडवणारं असतं, तो त्याच्या श्रेष्ठतेचा एक निकष आहे असं म्हटलं जातं. उत्तम लेखन आपली खोलवर चौकशी करतं. (शब्दप्रयोगाची प्रेरणा पु.ल.देशपांडे. मुगदळाच्या आणि बुंदीच्या लाडवांनी दातांची खोलवर चौकशी केली पाहिजे.…'माझे खाद्यजीवन', हसवणूक.) चांगलं लेखन प्रामाणिक असतं. अभिनिवेशरहित असतं. अंतर्मुख करणारं असतं. मग आपण हसतो तेव्हा काय होत असतं? आपण कशामुळे हसतो? तिथेही काही दर्शन घडत असतं का? की आपण अंतर्मुख होतो तेव्हाच फक्त दर्शन घडत असतं?
एक मात्र अगदी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. भाबड्या पिढीवरील पुलप्रभावामुळे लघुनियतकालिकांची चळवळ, साहित्यातील इतर प्रवाह काहीसे दुर्लक्षित राहिले. नेमाडेंनी तर 'आपल्याकडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व वगैरे भयंकर प्रकरण आहे ना….'असा उल्लेख कुठेतरी केल्याचं स्मरतं. त्याचा राग यायचं खरंच काही कारण नाही. पुलंची मोहिनी इतकी जबरदस्त होती की अनेक चांगले लेखक मराठी वाचकांच्या नजरेतून सुटले किंवा उशीराने लक्षात आले हे खरं आहे. पुलंची लोकप्रियता नक्की कशामुळे होती? मार्मिक, सर्वसामान्य (म्हणजे शहरी, निमशहरी मराठी मध्यमवर्गीय) माणसाला जवळचं वाटणारं, बुद्धिमान निरीक्षण आणि बेतोड विनोदाची डूब असलेलं, सात्विक विचार असलेलं, विद्वत्तेचा आव अजिबात न आणणारं, जुन्यात रमणारं, मूल्यांची पीछेहाट होताना बघून तळमळणारं - एका सामान्य स्थानावरून भोवतालचा गोंगाट टिपणारं पुलंचं लेखन बहुतेकांना आवडत होतं. माझ्यासारखा अत्यंत टिपिकल मध्यमवर्गीय घरातला मुलगाही त्याला अपवाद नव्हता. पुलंची दृष्टी अतिशय स्वच्छ वाटायची. आणि अर्थातच त्यांचा विनोद आणि उत्तम भंकस करायची ताकद त्यांच्या लिखाणाकडे आकर्षित करायची!
मराठी अवघड करण्याबाबत पु.ल.तीव्र नाराजी व्यक्त करीत. त्याबद्दल ते एका ठिकाणी म्हणतात, ज्या रेडियोने लोकांच्या बोलण्यातल्या भाषेची विशेष काळजी घेतली पाहिजे तिथे तर साराच आनंद आहे. रेडियोवरच्या मराठीतून दिलेल्या बातमीवर अमूक अमूक वृत्त पोलीस सूत्रांनी दिलं, असं जेव्हा ऐकलं तेव्हा ‘पोलीससूत्र’ हे काय प्रकरण आहे ते मला कळेना. आता कळलं, ‘सूत्र’ हे इंग्रजी सोर्सचं भाषांतर. पोलीस कचेरीतून ही माहिती कळाली असं सांगितलं असतं तर काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता जर बायकोकडून बातमी कळाली तर ती मंगळसूत्राकडून कळाली असं म्हणायचं का?
----------------

 संपूर्ण लेख "एका लेखकाने"  इथे आहे :

Tuesday, June 11, 2013

मराठी संकेत स्थळे : गाळीव इतिहास -भूगोल - व्यक्ती -वल्ली


कधी कधी एखाद्या भाषे चं एकदम प्रेम ओथंबून येतं तर कधी एखाद्या भाषे ची / स्टाईल / अॅक्सेंट ची एकदम तिडिक येते.. असं आपल्याला बरेच वेळा अनुभवास येते .. विशेषतः जगभर फिरलेल्या लोकांना हा अनुभव नक्की आला असेल .. एवढंच काय अगदी महाराष्ट्रात फिरलेल्या लोकांना सुद्धा असा अनुभव वेग वेगळ्या प्रांतान मध्ये तेथील अॅक्सेंट बद्दल हि येत असेल !
माझं मराठी वरचं प्रेम एकदम असंच जागं झालं आणि एक मराठी साईट तयार करावी अशी इच्छा झाली .. म्हणून आधी सर्व हयात  मराठी साईट्स ची पहाणी केली .. मार्केट रिसर्च स्टाईल नी ! अपोर्चुनिटी , गॅप्स , स्वॉट अनालीसीस असले शब्द नं वापरता .. माझी निरीक्षणे / ओब्सर्वेशन्स  इथे मांडत आहे. कुणावर हि वैयक्तिक टीका करण्याचा उद्देश्य नाही. पण साईट्स च्या मालकांना / चालवणाऱ्यांना ह्याचा नक्की उपयोग होईल .

४- ५ साईट्स निवडल्या आणि त्यांच्यावर प्रसिद्ध झालेलं साहित्य , लेख , लेखक , वाचक  याचा अभ्यास केला ... ( झेपल्या तेवढ्या कविता सुद्धा वाचल्या !)  क्रीटीकल फीडबॅक आणि अनालीसीस करायला सुरवात केली !

मनोगत , मिसळपाव , ऐसी अक्षरे , मीमराठी  ह्या साईट्स चा ह्या लेखना साठी अभ्यास केला . मायबोली हि मराठीत ली सर्वात पहिली साईट .. बऱ्याच वर्षान पूर्वी  १९९९-२००० मध्ये मी तिचा मेम्बर होतो .. तेव्हा ह्या साईट चं स्वरूप वेगळं होतं .. ती साईट म्हणजे भारता बाहेरील मराठी लोकांचं (विशेष करुन यू एस बेस्ड ) एक प्रकारचं फेसबुक होतं ! नंतर मायबोली बदलत -बदलत आता बर्या पेकी यशस्वी कमर्शयल  साईट झाली आहे. ई -कॉमर्स , अॅडस रेवेन्यू  हा एन आर आय क्लायंट्स कडून मिळणारा ! जवळ-जवळ प्रत्येकाला माहीत असलेली हि साईट आहे .. अमेरिकेतील प्रत्येक मराठी संमेलना ला ह्यांचा सहभाग असतो. केवळ हौस-मौज म्हणून सुरु केलेली हि साईट .. शिस्तबद्ध वाटचाली मुळे आता यशस्वी झाली आहे. मायबोली चे अनुकरण करत बर्याच साईट्स तयार झाल्या ..काही बंद पडल्या .
ओर्कुट ,फेसबुक आणि ब्लॉग्ज मुळे अनेक हौशी लेखकांना आणि वाचकांना मराठी वाचण्याचे , लिहिण्याचे आणि सोशल इंटरआक्शन चे ऑपशन्स मिळाले .. मराठी साईट्स ची मोनोपली गेली .. एक मोठ्ठा मराठी / देवनागरी लिहिणारा- वाचणारा वर्ग वेबवर  ( जालावर ) तयार झाला ! मराठी चान्नल्स सुद्धा सर्व देशात दिसू लागले .. मराठी लोकांना एकमेकांना जोडण्या ची अनेक साधने , उपकरणे , उपलब्ध झाली .. मोबाईल च्या जलद प्रगती मुळे तर आता लोकं जगात कोणाशीही जवळ -जवळ २४ तास "कनेक्टेड" असतात. ह्यामुळे वाचक लेखकांना एक प्रकारे स्वातंत्र मिळालं .. फक्त एका माध्यमावर / साईट वर / मिडीया वर  विसंबून नं रहाता मराठी लोकान बरोबर मराठीत "सोशल इंटरआक्शन " करणं सोपं झालं आहे .
अनेक उत्तम मराठी / देवनागरी ब्लॉग्ज , ब्लॉगर्स आहेत .. जे हौशी पायी उत्तम मराठी ब्लॉग्स लिहितात .

मनोगत , मिसळपाव , ऐसी अक्षरे , मीमराठी  ह्या "भारत बेस्ड " साईट्स आहेत .. एक प्रकारचा मराठी टच अधिक असलेल्या .. भारतातील / महाराष्ट्रातील मराठी मनाचा जास्त जवळ वाटणाऱ्या . सर्व साईट्स २००७ च्या आस पास सुरु झालेल्या .. म्हणजे जवळ जवळ ५-६ वर्ष झाली !
ह्या प्रत्येक साईट ला स्वतः च असं एक व्यक्ती मत्व आहे ... वेगळेपणा आहे ... २०-३० % मेम्बेर्स हि ह्या पेकी एकाच साईट वर लिहिणारे , एकाच साईट वर चाटींग करणारे , एकाच साईट शी एकरूप / लॉयल ! ६०-८० % लोकं हि ह्या साईट्स वर कॉमन आहेत. दिवसभर ऑफिस मधून इंटरनेट वापरणारी !  भारतात जास्त प्रमाणात लोकं ऑफिस मधूनच इंटरनेट वापरतात .. टाईम पास ला मराठी साईट्स वर लॉगइन होतात !

मनोगत हि बाकीच्या तीन साईट्स पेक्षा जरा वेगळी आहे .. "कर्मठपणा , ताठ बाणा " ह्या शब्दाचं उदाहरण . इथे मराठी च्या शुद्ध स्वरूप , शुद्ध लेखना ला अधिक महत्व आहे .  साईट हि अगदी रेखीव .. फालतू पणा तसा न के बराबर ..भाषा हि बर्यापेकी पुस्तकी , अगदी कमी आणि निवडक प्रतिक्रिया .. त्या हि सुसंगंत आणि बिनविरोध ..पद्धतशीर पणे एका मागोमाग एक ..लाईनीत .. एखाद्या कर्मठ , सदाशिव पेठेतल्या सुंदर वाड्यात जावं असं ... कडक नियम !  अवघडल्या सारखं वाटतं इथे पण काही गोष्टी इतक्या नियमात ठेवल्या तरच एक प्रकार ची "आयडेन्टीटी" निर्माण होते .. टी आर पी , मेम्बेर्स च्या नंबर ला अजिबात जास्त भाव नं देणारी ...आणि ..बहुतेक.. म्हणूनच वाचक निर्माण करणारी !  येयचं तर यां .. पण नियम पाळावेच लागतील अशी ! कट्टर ! कंटेंट ची क्वालिटी उत्तम ठेवणारी . एका विशिष्ट प्रकार च्या मराठी लोकान साठी ..बर्यापेकी "इंटल्लेक्चुअल" ..."वेल रीसर्च्ड" कंटेंट.  नो-नॉनसेन्स ! एका सच्च्या मराठी प्रेमी , माहीतगार , हौशी-मौजी  माणसांनी चालवलेला 'उपक्रम' कळून येतो !

मिसळपाव , ऐसी अक्षरे आणी मीमराठी  ह्या साईट्स म्हणजे  "सिस्टर /ब्रथर " .. भाऊ -भाऊ  बहुतेक "सावत्र " किंवा भाऊबंदकी च्या गुंत्यात अडकलेले !  ड्रुपल च्या एकाच साच्यात तयार झालेले .. वेग-वेगळी प्रकृती असलेले !
मिसळपाव हि  मोठी .. बहुतेक भारत बेस्ड पहिली लोकप्रिय साईट ! सामान्य मराठी माणसा ला हवाहवासा वाटणारा  वात्रटपणा , मिश्किली, भांडणे , कंपूबाजी , खाणं, गाणं , नाटकं , सिनेमे , इकडच्या तिकडच्या गप्पा ,राजकारण (काहीं साठी "राज" कारण ) , मराठीपणा चा बुलंद आवाज करत सर्वांना सामावून घेणारी साईट ...असा  उल्लेख करीन ! काही लोकांच्या मते हि साईट  भारत बेस्ड  मराठी साईट्स ची माउली आहे. एखाद्या मराठी सिनेमात असावा तसा सर्व मसाला इथे आहे ... लावणी , आयटम सॉंग , सामान्य माणसाला समजणारी - आवडणारी बोली भाषा ... शिवाय .. टवाळ पणा , प्रक्षोभक लेख , भांडणं आणि "मराठीमधून माज" (अस्मिता ह्या नावाखाली )  .. बहुतेक म्हणूनच सर्वात लोकप्रिय मराठी साईट .. भरपूर मेम्बर्स .. टी आर  पी साठी उत्तम .. अगदी गावातल्या शाळकरी मराठी मुला पासून परदेशस्थ स्थाईक मराठी माणसा ला काही ना काही देणारी !              

ऐसी अक्षरे च्या सर्व क्यार्रेक्टरस्टिक्स वरून हि साईट  मध्यम वर्गा चं मराठी जाला वर प्रातिनिधिक रूप वाटते .  मराठी साईट्स च्या एका टोकाला मनोगत आणि दुसऱ्या टोकाला मीमराठी ला ठेवलं .. तर .. ऐसी अक्षरे कुठेतरी मध्यावर स्थिर होण्याचा प्रयत्न करताना दिसते . सुबक आणि सुंदर यू आय , दर्जा , माहिती , कंटेंट  !  इथल्या मालक -एडिटरस् नी दुसऱ्या कुठल्या तरी साईट वरून फुटून स्वतः चा कंपू बनवला आणि स्वतः च्या "इगो" पायी हि साईट बनवली हे लगेच जाणवतं.  इथले एडीटर्स बाकीच्या मराठी साईट्स वर फिरून तिथल्या विषयां च्या जवळ पास चे विषय ह्या साईट्स वर सुरु करतात असं वाटतं .. एडिटर्स खुद्द  स्वतः चे लेख बाकीच्या साईट्स वर टाकतात .. बहुतेक टी आर पी साठी ! किंवा स्वतः चा अति-शहाणपणा , विक्षिप्त पणा  सगळ्याना दाखवण्या साठी ..किंवा नुसतं नावाच्या प्रसिद्धी साठी  (माहीत नाही )
"अति शहाण्या स्युडो-इंटलेक्चुअल्स साठी स्वतः ची लाल दाखवण्या साठी केलेली खटपट " असे एका जाणत्या नी ऐसी अक्षरे चं वर्णन केलं ..  बहुतांश वाचक आणी हौशी लेखकांनी ह्या साईट बद्दल त्यांची "निगेटीव" प्रतिक्रियाच व्यक्त केली आहे.
हास्यास्पद गोष्ट म्हणजे एडिटर्स एकमेकांना गुण देऊन बाकीच्या सर्व कॉमेंट्स दाबतात ! येवढं एडिटिंग करण्याची गरज ह्या साईट ला कां लागते हे समजत नाही. एकमेकाची पाठ चोळणे असं काहीसे !
 ह्या साईट चा  यूजर इंटरफेस हि एक चांगली बाब आहे . एडिटर्स नी पाचकळ पणा सोडला आणि जरा वयस्क पणा अंगीकृत केला तर  ह्या साईट ची परिस्थिती सुधारू शकेल. दोन तीन एडिटर्स सोडले तर साईट चांगली आहे.

मीमराठी हि एका माणसाने स्वतः च्या हिम्मतीवर "मराठी साईट तयार करायचीच " म्हणून केली आहे ह्याचे कौतुक वाटते. हि साईट "डेवलपिंग" साईट आहे .. जवळ जवळ १००% मेम्बर हे मिसळपाव साईट चे मेम्बर्स होते ..आहेत. गुण्या गोविंदाने ते दोन्हीही साईट्स वर वावरतात .. साईट वर अस्सल बोली भाषे चा पगडा दिसून येतो. म्हणून सामान्य मराठी माणसाला ती पटकन आपलीशी वाटते ! जर मनोगत ला  आपण स्पेक्ट्रम च्या एका टोकाला ठेवलत  तर दुसऱ्या टोकाला मीमराठी ला ठेवायला हरकत नाही !
मी मराठी च्या थ्रेडस् वर एक प्रकारचा "कट्टा" फील येतो .. सगळे अगदी मुक्त पणे मनातले लिहीत असतात .. थोडीफार टिंगल टवाळी चाललेली असते .. खरा संवाद बघायला मिळतो .. बोली मराठी भाषा .. सामान्य माणूस वापरतो ती ..जशी वापरतो तशी ..पुस्तकी अजिबात नाही .. एका मेकांचे मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध -ओलावा दिसून येतो.
मी मराठी ला सुधार/ प्रगती  करायला खूप वाव आहे .. म्हणून सर्वात जास्त ग्रोथ पोटेन्शियल ह्या मराठी साईट ला आहे असं वाटतं. एकदा चांगला टेक्निकल सपोर्ट मिळाला कि आपोआप बाकीचं जुळून येईल.

ह्या सर्व मराठी संकेत स्थळान वर काही व्यक्ती आणि वाल्लींचा विशेष वावर दिसतो ..त्या लेखकांची विशेष अशी स्टाईल दिसते .. काहींचा विशेष असं अजेंडा दिसतो .. काही विशेष अश्या विषयान वर लिहिताना दिसतात .. काही फक्त टिंगल टवाळी करत सर्व साईट्स वर फिरत .. मजेशीर सार्कास्टिक कॉमेंट्स करत दिवस घालवतात .. काही नुसतेच पेटवा पेटवी करतात .. काही अति भावनिक असतात / भासवतात ! हे सगळे गुण बघायला मिळाले कि मजा वाटते .. मुख्य म्हणजे प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे मराठी माणसाचा भांडण्याचा स्वभाव .. Argumentative Indian  !  ह्या लेखाच्या वाचकांनी अश्या हॅन्डल्स , आय डिज , व्यक्तीन बद्दल प्रतिसाद स्वरुपात लिहिलं तर आवडेल !

माझं वैयक्तिक मत  विचाराल तर  ह्या सर्व साईट्स वाचक म्हणून खूप भावल्या -आवडल्या .. त्यांचा वेगळेपणा समजलं  ! सर्व मराठी साईट्स ना  अनेक शुभेच्छा ! अगदी मनसे !



Friday, May 31, 2013

एगीटेरीयन - एक खाद्य भ्रमंती


भारता बाहेर विशेष करून अमेरिकेत अंड्याचे अनेक प्रकार मिळतात .. मेक्सिकन , स्पानिश वैगरे ! अंड्या शिवाय बहुतेक अमेरिकन ब्रेकफास्ट करतंच नाही !  "Waffle House" , "Dennys" , "IHOP" सारख्या रेस्टॉरंटस् मध्ये अंड्यांचे अनेक प्रकार मिळतात .. पोटभरीचं "Brunch" हे सगळ्यांचं आवडीचं .. मी हि अमेरिकेत असताना ह्या रेस्टॉरंटस् चा भोक्ता होतो !
मी पक्का एगीटेरीयन आहे म्हणून ... मी पुण्यात अशीच एक खाद्य भ्रमंती केली .. फक्त अंड्याचे पदार्थ चाखण्याची !
पुण्यात तश्या अनके अंडा-भुर्जी वाल्या गाड्या आहेत .. भुर्जी हा प्रकार तर प्रत्येक गाडी वर वेगळाच आणि अगदी "पेटन्ट" असलेला ..  त्यामुळे थंडी च्या दिवसात / रात्री अश्या अनेक गाड्यान वर भुर्जी-पाव खाणे चालू असते .. अंड्या चे पदार्थ खाण्याचे हक्का चे ठिकाण म्हणजे इराणी हॉटेल्स ..  डेक्कन क्वीन मधलं ओम्लेट , रेल्वे कॅन्टीनमध्ये मिळणारी "ब्रिटीश" पद्धतीची ओम्लेट..किंवा फक्त उकडलेली मिरपूड-मीठ-लाल तिखट पेरलेली अंडी ...  त्यांची चव वेगळीच ..त्यांच्या बद्दल परत कधी तरी  !
ह्या लेखात मी पुण्यातील तीन  फक्त अंड्या चे पदार्थ खाऊ घालणार्या "स्पेशालिटी" रेस्टॉरंटस् बद्दल लिहिणार आहे ...

१)  योकशायर (YolkShire) :  कोथरूड , करिष्मा चौकातलं माझं आवडतं .. एक प्रकारचा अमेरिकन ब्रेकफास्ट हाउस किंवा ब्रिटीश रेस्टॉरंट ची आठवण करून देणारं .. पदार्थांचं अतिशय सुंदर "प्रेझेंटेशन " ..  मेनू कार्ड वाचताना काय खाऊ आणी काय नको होऊन जातं !  अगदी स्पनिश-अमेरिकन प्रकारान पासून अस्सल देसी स्टाईल भुर्जी ..सगळं काही !  इथला मसाला चाय हि उत्तम !
करिष्मा च्या खाऊ "लाईन" मधलं आवडीच्या ठिकाणां माधलं एक .. खुर्च्या टेबलं बाहेर मांडलेली .. ऐसपैस बसून अंड्याचे सर्व प्रकार सकाळ -दुपार -संध्याकाळ -रात्र  .. खात रहा !

२)  एगीटेरिया ( Eggeteria ) : पौड रोड ,  एम आय टी खाऊ गल्ली रामबाग कॉलनी  ... नव्याने सुरु झालेलं हे स्पेशालिटी एग रेस्टॉरंट .. इथला मेनू कार्ड हि खूप आकर्षक आहे ! Combo डिशेस उत्तम ! आय पी एल च्या दिवसात .. टीव्ही लावलेला .. संध्याकाळी मॅच बघत पटकन एक दोन डिशेस संपून जातात !  इथे हि इस्ट - वेस्ट ..सर्व प्रकारच्या फक्त एग्ग्स असलेल्या डिशेस ! जास्त करून कॉलेज क्राउड असल्या मुळे दर हि बेताचेच आहेत ..

३) अथर्व एगस्  कॉर्नर (Atharva Eggs Corner) :  निलायम टॉकीज चौक ..  श्री उभे यांनी सुरु केलेले एक उत्तम हॉटेल ! फक्त अंड्याचे पदार्थ ..अनेक .. सर्व देशी पद्धतीचे !  इथली भुर्जी म्हणजे एक नंबर ! अशी चव जी दुसरी कडे कुठेही मिळणे नाही ! अंडा खिमा आणी  बॉईल्ड-फ्राईड एग्ग्स हि खासियत ! अस्सल देशी पद्धत .. उत्कृष्ट चव आणि दर्जा ! पुण्याचं एक मानाचं खाण्याचं ठिकाण ! गर्दी भरपूर .. त्यामुळे वेळ काढून निवांत पणे मित्रान बरोबर जा .. पोटभर खाल्ल्या नंतर ..जवळच चालत एस पी च्या पानवाल्या कडे जरूर जा !




Tuesday, May 28, 2013

सावरकर , एकनाथ ,विनोबा !


आज स्वा . सावरकरांच्या साहित्या वर आधारित "महाकवी सावरकर"  हा कार्यक्रम पाहिला !  प्रा . धनश्री लेले ह्याचं ओजस्वी निवेदन - निरुपण  खूप आवडलं ... त्यांचं तेज , वाणी , ज्ञान , शब्द ऐकून असं वाटलं कि सरस्वती खरोखरंच ह्यांच्या वर  प्रसन्न आहे !  राम शेवाळकर , शिवाजीराव भोसले  आदी मान्यवरांच्या रांगेत त्यांची गणना लवकरच होईल यात शंका नाही !
सावरकर हे एक खरे कवी होते .. त्यांचं साहित्य समजून घेण्या साठी सुद्धा एक उंची गाठावी लागते हे खरं ! ते जितके प्रखर राष्ट्रवादी .. कठोर वाटणारे होते तेवढेच हळवे होते .. त्यांच्या कवितांच्या गर्भात ते आपल्याला भेटतात हे जाणवलं !
लहानपणी मला  पु ल , व पु , गदिमा , प्र के अत्रे  अश्या मराठी लेखकांनी एकदम प्रभावित केलं होतं ! त्यांची मिळतील ती पुस्तकं वाचून काढली होती ..
प्रत्येक कवी / लेखक हा आपल्याला एका विशिष्ट पल्ल्या पर्यंत पोहोचल्या वरच समजायला लागतो .. खऱ्या अर्थानी भेटतो .. तसाच काहीसा अनुभव मला येतोय ...
मला  विनोबा ,एकनाथ, सावरकर ह्यांनी आजकल पकडून ठेवलं आहे ..पुढची बरीच वर्ष हे साथ देणार आहेत  !

Wednesday, May 22, 2013

उन्हाळ्या चे "साऊंडस्" आणि "साईट्स"




पहाटे पहाटे कोकिळे ची कुहु कुहु ...
अढी लावलेले आंबे पिकल्याचा सुवास....
पहाटे  "एक्झरसाईज ड्रेस " घालुन फिरायला निघालेली कुटुंब
सकाळी आठ-नउ पर्यंत कामं उरकुन आलेला थकवा
उन्हात क्रिकेट खेळणारी मुलं....
बर्फाच्या गोळ्या च्या गाडी पुढे रांग लावणारी मुलं...
दुपारच्या उन्हात आडोशाला सावली शोधुन निवांत झोपलेला मजदुर..
कैरया पाडण्या साठी दगड मारणारी मुलं आणि त्याना पळवुन लावणारे मालक/माळी....
करवंद, जांभळं,चिंचा, कैरया काप विकणारया बायका....
उन्हानी व्याकुळ झालेली मनं...
उन्हात भिर-भिर फिरणारी रस्त्यावरची कुत्री..
उन्हानी त्रस्त जीव, घामाच्या ओघळणारया धारा....
सुनसान रस्ते....दुपारची शांतता...
फॅनचा / एसी चा संथ पण कंन्टिन्युअस बॅगग्राउन्ड नॉइज...
दुचाकिवर स्वार सन कोट, गॉगल,डोक्याला आणि चेहरया वर फडकं बांधुन तुरु-तुरु जाणार्या युवत्या....
गॅलरीत आराम खुर्ची वर शांत पणे झोपलेले आजोबा...
पापड, कुर्डया वैगेरे वाळवायला घालुन.... लोणची करत स्वयंपाक घरात गुंतलेली आजी...
एकदम अचानक संध्याकाळी आलेली पावसाची सर आणि मातीचा मृदगंध..
संध्याकाळी  मुलांच्या खेळण्याचा आरडा ओरडा...दंगा...
गच्चीवर / ओसरी वर  एकत्र जमलेला कट्टा
रात्रीचा तो पश्चिमे चा मंद वारा
दूरवर वाजणारी एक शांत धुन....बासरी...






Tuesday, May 21, 2013

असह्य उन्हाळा ...




उन्हाळा किती हि असह्य झाला किंवा नकोसा वाटला तरी फणस, आंबे, कलिंगडा च्या चवी मुळे मी नेहमी वैषाखा ची वाट पहात असतो. अजुन एक फळ जे मला फार आवडतं ते म्हणजे "आळू" . चिकू सारखं पण थोड गुळगुळीत आणि चवीला आंबट गोड असं हे फळ फक्त वैषाख-ज्येष्ठ महिन्यात येत.
लहानपणीचा संध्याकाळी -रात्री चा फेवरेट टाईमपास म्हणजे मित्र मंडळीं बरोबर गप्पा मारत .. कधी घरात बनवायचं पॉट-आईस क्रीम , भेळ आणि ...रात्री भुताटकीच्या गोष्टी ऐकत चरायचं ...त्या साठी  हक्काचा जिन्नस  म्हणजे .. भुईमुगाच्या शेंगा .. त्यांची ती भरमसाठ टरफलं ...एक मुठ भर खाऊ असं म्हणत आपण सहज पातेलं भर खातो आणि परत म्हणतो ..अजून थोड्या असत्या तर बरं झालं असतं .. उकडलेल्या शेंगाची मजाच काही और  .. भाजलेल्यांची चव वेगळी .. आणि  उकडून भाजलेल्या शेंगा हि एक वेगळीच चीज आहे ! ऑल टाईम फेवरेट !
आता तश्या ओसर्या किंवा गच्च्या कमीच असाव्यात ... बहुतेक असे दिलखुलास एकत्र जमण्याचे ... एका मेकाच्या घरात ऐसपैस फिरण्याची .. शेजारच्या घरात हक्कानी जाऊन एक-दोन घमेली शेंगा पोत्यातून घेण्याची प्रथा- संस्कृती हि नाहीशी होत चाललेली आहे

प्रगती म्हणजे शेजाऱ्यांना एकमेका पासून दूर ठेवणाऱ्या सिमेंट च्या भिंती .. नवी नवी सिमेंट ची जंगल उभी करणं असं समीकरण झालं आहे. हे असं किती दिवस चालणार हे माहित नाहि !
परत एकदा मला हे सगळं "नॉस्टालजिक" बनवतं आहे ! उन्हाळा लवकर संपून गेलेलाच बरां !





Monday, May 20, 2013

.. उन्हाळा





असा हां उन्हाळा ..  

सकाळि ८-९ च्या आत सगळी कामं उरकुन दिवस भर एसीत आराम करायला लावणारा.. 
पुस्तकं वाचत, चरत बसायला लावणारा ..
कधी एकदा सुर्यास्त होतोय ह्याची वाट पहात बसायला लावणारा .. 
संध्याकाळी आ पी एल च्या २०-२० मॅचेस बघत बघत झोपुन जायला लावणारा ... उन्हाळा 

कुटुंब - मित्र-मैत्रिणींना एकत्र आणणारा ...
मामाच्या गावला नेणारा .. 
आजोबांना नातवंडांची किलबिल ऐकवणारा .. 
आभाळा येवढं नं मावणारं असं सुख देणारा ...हवा हवासा वाटणारा ... उन्हाळा  !

ए सी ..कूलर..पंखे..थंड पाण्याचे माठ..दुपारची शांतता...साम-सूम..वाळा सरबत देणारा..उन्हाळा 
करवंद, जाम, जाभळं,ताड गोळे, कैरया, आंबे,फणस,कलिंगडं, आळवं .. देणारा उन्हाळा !

कधी तरी अगदी पुढच्या वर्षी पर्यंत वाट पहात ठेवणारा ... आणि  पट-सरशी  परत येणारा.. उन्हाळा

जिवनाचा प्रवास संथ करणार्या "दुपारीं" चा अनुभव देणारा ..उन्हाळा
सृष्टी, जिवन, आयुष्य ह्या सगळ्या कडे एका नव्या नजरेने बघायला लावणारा... उन्हाळा

नकोसा वाटणारा पण एकांतात गहन विचार करायला लावणारा ...  उन्हाळा
बहुतेक हां उन्हाळा लवकरच संपेल .. असा विश्वास देणारा ... उन्हाळा !
आणि आयुष्या ची नवी द्रुष्टी देणारा, हळवं करणारा हि ... उन्हाळा च !





Sunday, May 19, 2013

आज रविवार .. म्हणून मिसळी चा विषय निघाला


आज रविवार .. म्हणून मिसळी चा विषय निघाला ... उत्तम ५१ मिसळीं ची यादी मिळाली ..उत्सुकते पोटी सहज नजर टाकली तेव्हा लक्षात आलं .. ह्यातील फक्त पुण्यातल्या , एखादी नाशिक ची ,काही कोल्हापुरातल्या , काही मुंबईतल्या  मिसळी  आपण खाल्ल्या आहेत ! माझी जुनी  पुणेरी मिसळ वरची पोस्ट  इथे आहे !



उत्तम मिसळ मिळणारी ५१ नावाजलेली ठिकाणे :

१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती केंद्र, लोणावळा
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड, पुणे
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड, पुणे
७) श्री- शनिपारा जवळ, पुणे
८) नेवाळे- चिंचवड
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक.
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश, दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे, दादर
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) माधवराव, सातारा
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार,
४५) छत्रे उपहारगृह - मुगभाट लेनच्या दारात.
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)
४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावर नेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारुती जवळ तापीकर काकांचे होटेल, पुणे
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेणला चावडी नाक्यावर, तांडेल






ह्या लिस्ट मध्ये  आज (२३.६.१३) .. पुण्यातील अजून एक मिसळ टाकत आहे ..  मंगला टॉकीज जवळची  "मामांची  करंट मिसळ " .. ह्या मिसळी ला हि जवळ जवळ ३२ वर्षा चा इतिहास आहे ! स्वस्त - चवदार - वाल्यु फॉर मनी अशी मिसळ .. रिक्षावाल्यांची एकदम आवडती मिसळ आहे !





Sunday, May 12, 2013

चढता सुरज धीरे धीरे ...



आज अचानक मुंबई च्या ९६-९७ साला ची आठवण  झाली .. कारण हि तसंच .. कर्णिक चा जिगरी दोस्त आणि आमच्या शिवाजी पार्क कट्ट्यावरचा "रफी"+ "किशोर" .. एकदम सही आवाजात  गाणारा सम्या देशपांडे  गेल्याची खबर मिळाली .. गेला तो हि दुबईत ! ते एका दृष्टीने बरं झालं ! त्याला तेव्हा पासूनच दुबई चं प्रचंड "ऐटर्याक्शन" होतं .... लोकं इंग्लंड - अमेरिकेची स्वप्न बघतात ... सम्या फक्त दुबई एके दुबई चं स्वप्नं बघायचा  !  पैसा मिळवायचा म्हणून दुबई ला प्रस्थान केलेला सम्या .. खरा  टेकी .. त्यांनी मला माझा पहिला कॉम्पुटर "असेम्बल" करून दिला होता ! मला मुंबईतल्या "इलेक्ट्रोनिक्स" बाजाराशी ओळख करून दिली होती .. हिंदी उर्दू एकदम सही बोलणारा ! आमच्या कट्ट्यावरचा तो "वसंत खान" होता. माहीम च्या मध्यम वस्तीत ल्या चाळीत एका खोली च्या संसारात वाढलेला सम्या !

तो शिवाजी पार्क वरचा कट्टा म्हणजे अख्या मुंबई ची खबर ठेवायचा.. आमच्या सर्वांना जोडणारी एक नाळ म्हणजे गाणं आणि खाणं !
सेना भवन च्या इमारतीत राहणारा कर्णिक, पुढे माहीम ला राहणारा कौशिक , दादर चा नितीन , वरळी-ब्यांडबॉक्स चा साखळकर आणि वरळी सी फेस वरून मी आणि पम्प्या ,आमच्या सगळ्यात कल्ला करणारा पाटील आणि डोम्बिवली चा जोशी ! अख्ख मुंबई आम्ही एकत्र फिरलो..प्रभादेवी चं रविंद्र , पारलं , बोरिवली ते अगदी ठाण्या ला दिनानाथ ला !
मुंबई ला के ई एम हॉस्पिटल मध्ये काम करत असतानाचे ते दिवस .. संगीतमय ! वरळी सी फेस ते गिरगाव - पेडर रोड ते पार्ले  असे अनेक प्रवास मैफिली ऐकण्या साठी केले .. मित्रांचा  घोळका बरोबर नसलेला एकही  शनिवार-रविवार मला आठवत नाही ! शिवाजी पार्क वरचा तो कट्टा ..गणपती मंदिर , वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ..माहीम चं काशी विश्वेश्वरा चं मंदिर , समोर मिळणारी पाणी पुरी / रगडा पुरी .. सेना भवन च्या आसपास चे  अस्सल मराठी खाण्याचे अड्डे ..कोठावळे बुक स्टॉल.. तिथेच मिळणारा तो मोठ्ठा गोल बटाटे वडा .. तांबे आरोग्य मंदिर , गुरुदत्त !
त्या काळी मोबाईल फोन नव्हते ..बहुतेक म्हणूनच आमची गट्टी एकदम घट्ट जमली .. नं चुकता सगळे शिवाजी पार्क च्या कट्ट्यावर हजर रहायचे.. मग बेत ठरायचे ! त्यात अनेक सहली , खाद्य भ्रमंत्या , व्ही टी ओव्हल  मैदान वरचे कांगा लीग चे सामने .. तिथे मिळणारी पाव-भाजी , काला खट्टा ...

मुंबईतल्या त्या वास्तव्यात एक अविस्मरणीय अशी मैफिल म्हणजे ..पार्ल्याच्या तीन दिवस-रात्र चाललेल्या   हृदयनाथ-वसंत बापट - राम शेवाळकर -बाबासाहेब पुरंदरे आणि शिवाजीराव भोसल्यांच्या  मैफिली ...त्याच्यांशी ओळख -गप्पा ... श्रीकांत मोघेंची भेट ..मग जवळ जवळ दर रविवारी  गुरुदत्त वर ठरलेली भेट  ! "पुण्याचा" म्हणून सुधीर गाडगीळांनी करून दिलेल्या ओळखी .. अगदी बाळासाहेबां बरोबर झालेल्या गप्पा .. शिवाजी पार्क च्या कोपऱ्यावरच्या बियर बार च्या बाहेर बसून बियर पिणारा राज ( टीप : त्या काळी राज तसा सामान्य होता ).. त्याचाशी झालेल्या दिलखुलास गप्पा ! ... ह्या सर्व वेळी सम्या माझ्या बरोबर होता !

सगळं अचानक आठवलं आज ..  

कव्वाली बहुतेक पहिल्यांदा "लाइव" ऐकली ती १९९६-९७ साली सम्या मुळेच आणि त्याच्या बरोबरंच .. त्याच्या एका "मुसलमान" मित्राच्या "मंडळात" ..   तेवढ्या साठी लोकल चा प्रवास करून दादर ते  मुलुंड गेलो होतो ! तेव्हा गुरुतुल्य  श्यामकांत परांजपे मुलुंड इस्ट ला राहत होते .. फिल्म्स डिविजन पेडर रोड वर नोकरी करत होते .. त्यांच्या बरोबर गिटार , कीबोर्ड , पेटी आणि अकोरडीयन असं सगळं शिकताना / वाजवताना.. संगीताची खरी मजा लुटली ...  त्यांच्याशी ओळख हि सम्या मुळेच झाली !  आज तीच कव्वाली मला आठवते आहे .. आज सम्या अनंतात विलीन झालाय पण तेव्हा त्याच्या बरोबर ऐकलेली हि कव्वाली जीवनाचा सार्थ सांगून जाते !  अजीज नाझा यांची ...

चढता सुरज धीरे धीरे ..ढलता है ढल जायेगा !



-------------------------------------------------------------------------

हूए नाम और बेनिशान कैसे कैसे
जमीन खा गई नौजवान कैसे कैसे


आज जवानी पर इतराने वाले कल पछ्ताएगा
चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा
ढल जाएगा ढल जाएगा तू यहाँ मुसाफिर है , यह सरहा- ए-फानी है
चार रोज कि मेहमान तेरी जिंदगानी है

जन जमीन जर जेव्हर कुछ न साथ जायेगा
खाली हाथ आया है खाली हाथ जायेगा
जान कर भी अंजाना बन रहा है दिवाने
अपनी उम्रेफांनी पार तन रहा है दिवाने

इस कदर तू खोया है इस जहां के मेले मे
तू खुदा को भूला है फस के इस झमेले मे

आज तक ये देखा है पानेवाला खोता है
जिंदगी को जो समझा जिंदगी पे रोता है

मिटने वाली दुनिया का ऐतबार करता है
क्या समझ के तू आखिर इससे प्यार करता है

अपने अपने फिक्रो में जो भी है वह उलझा है
जिंदगी हकीकत में क्या है कौन समझा है
आज समझले... आज समझले कल ये मौका हाथ ना तेरे आयेगा
ओ गफलत कि नींद में सोने वाले धोका खायेगा
चढता सुरज ..धीरे धीरे

मौत ने जमाने को ये समा दिखा डाला
कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला

याद रख सिकंदर के हौसले तो आली थे
जब गया था दुनिया से दोनो हाथ खाली थे

अब न वो हलाकू है और ना उनके साथी है
जंग को छोड पोरस है और न उसके हाथी है

कल जो तनके चलते थे अपनी शानो शौकत पर
शम्मा तक नही जलती आज उनकी पुर्बत पर
अपना हो या आला हो सबको लौट जाना है
मुफ्लीफोह तवंदर का कब्र हि ठिकाना है

जैसी करनी.... वैसी भरनी आज किया कल पायेगा
सर् को उठा कर चालने वाला एक दिन ठोकर खायेगा
चढता सुरज धीरे धीरे ...

मौत सबको आनी है कौन इससे छुटा है
तू फना नही होगा येह खयाल झूठा है

सांस तुटते हि सब रिश्ते तुट जायेंगे
बाप , मा , बेहन , बीवी , बच्चे छूट जायेंगे

तेरे जितने है भाई वक्त का चलन देंगे
छीन कर तेरी दौलत दो हि गज कफन देंगे

जिनको अपना कहता है कब ये तेरे साथी है
कब्र है तेरी मंजील और ये बराती है

लाके कब्र में तुझको उरदा पाक डालेंगे
अपने हाथो से तेरे मुह में खाक डालेंगे
तेरी सारी उल्फत को खाक में मिला देंगे
तेरे चाहने वाले कल तुझे भूला देंगे

इसलिये यह कहता हुं खूब सोच ले दिल में
क्यूं फसाये बैठा है जान अपनी मुश्कील में

कर गुन्हाहो से तौबा आके बत संभल जाये दम का क्या भरोसा है ..जान कब निकल जाये

मुट्ठी बांध के आने वाले ..... हात पसारे जायेगा
धन दौलत जागीर से तुने पाया क्या पायेगा
चढता सुरज धीरे धीरे ...


अजीज नाझा

------------------------------------------------------------

Saturday, May 4, 2013

मराठी ब्लॉग लिहिल्याचं खरं समाधान !



मराठी ब्लॉग लिहिण्याची सुरवात केली तेव्हा जे मनात येईल ते लिहीत गेलो ... त्यामुळे विषय हे मुख्यत्वे खाणं, पिणं , गाणं , पुल , वपु , गदिमा असे सिमित राहिले !
आज एक अतिशय विचित्र पण समाधान कारक अनुभव आला !  सकाळी मित्रा बरोबर मिसळ खायला गेलो होतो .. समोरच्या बाकावर आमच्या सारखेच दोन खवय्ये मित्र मिसळ खायला आलेले होते .. त्यांची तो पर्यंत अज्जिबात ओळख नव्हती ... मिसळ खाता -खाता विषय मिसळी / पुणेरी मिसळी / पुण्यातील खाद्य संस्कृती , खाऊ गल्ल्या ई . ई वर आला ... पुढे ह्या दोघा मित्रांनी आम्हाला बऱ्याच ओळखीच्या खाऊ गल्ल्या / ठिकाणां बद्दल सांगायला सुरवात केली .. त्या मुळे गप्पा अजून रंगल्या .. हे दोघे मित्र नुकतेच  सि.ए (C.A) झालेले होते  आणि पुण्यातील वेग-वेगळ्या ठिकाणी रोज खाद्य-पेय  पदार्थांची मजा लुटत होते हे गप्पांच्या ओघात समजले !  मिसळ - भजी - दही - ताक वैगरे खाऊन झाल्या वर.. आम्ही बिल देऊन बाहेर पडलो ... आमच्या बरोबर हे आमचे नवे दोस्त पण चहा - पाना च्या टपरी पर्यंत पोहोचले ..परत गप्पा सुरु झाल्या .. 
पान खाऊन झाल्यावर ह्या "नव्या"मित्रांनी आम्हाला त्यांच्या खाद्य यात्रेचा गुपित सांगितलं !  तेव्हा माझा  मित्र गुंड्या ..जोर-जोरात हसायला लागला .. मला काही समजेना .. मी विचारलं .. काय झालं येवढं हसायला ? ..मला सुद्धा सांग ... तेव्हा मला आणि माझ्या "नव्या" खवय्या मित्रांना कोडं उलगडलं !
आमचे "नवीन" खवय्ये मित्र सांगत होते कि त्यांनी पुण्यातली चांगली -चांगली खाण्याची ठिकाणं हि एका ब्लॉग वर वाचली आणि ते उन्हाळ्याची खाद्य भ्रमंती करत आहेत ... त्या ब्लॉग चा पत्ता गुंड्या विचारात होता आणि तो समजल्या वर जोर जोरात हसत होता !  त्या ब्लॉग चा पत्ता होता  "अक्षरास हसू नये" ....    veedeeda.blogspot.in   !!!! 

अश्या प्रकारे आम्हाला अजून दोन "नवे" खवय्ये मित्र मिळाले ! मला मनातून अत्यंत आनंद झाला ह्याचं कारण म्हणजे .. आपण जे ब्लॉग वर लिहितो ती माहिती खवय्यांना उपयोगी पडली ! ह्या सुखद भेटी आणि अनुभवा मुळे लगेच हे ब्लॉग पोस्ट लिहायला घेतलं ( मुद्दाम दुपारच्या खाण्यातून वेळ काढून ! )

मराठी ब्लॉग लिहिल्याचं खरं समाधान ! 



( पुण्यातील उन्हाळ्यातल्या  खाण्या - पिण्या विषयी च्या ब्लॉग लिंक्स ह्या  दोन  पोस्ट्स  वर आहेत  



Friday, April 26, 2013

वि आर ऑन - होऊन जाऊ द्या ( We are on - Houn jaau Dyat )



मराठी तील दिग्गज कलाकारांना घेऊन ..अमोल पालेकर दिग्दर्शन करणार असं समजलं तेव्हा पासून हा सिनेमा पहायचा हे ठरवलं होतं .. नाव हि जरा हटके ... "वि आर ऑन - होऊन जाऊ द्या" (We are on - Houn Jau dya) .. आज पहिल्या दिवशी पहिला शो पाहिला .. प्रीमियर !

अशोक सराफ मकरंद अनासपुरे दिलीप प्रभावळकर सतीश आळेकर विजय केंकरे आनंद इंगळे मनोज जोशी उपेंद्र लिमये आतिशा नाईक , गौतम जोगळेकर सुहासिनी देशपांडे शिल्पा नवलकर सुनील गोडबोले वंदना गुप्ते निवेदिता सराफ समीर चौघुले पुष्कर श्रोत्री मनोज जोशी रमेश भाटकर सतीश पुळेकर   .. हि कलाकारांची यादी पहिली कि सिनेमा कडून एक अपेक्षा निर्माण होते ...

सिनेमा ची सुरवात "सई परांजपे " स्टाईल नी होते ... हा सिनेमा बासुदा व हृषिदा ह्या दिग्गज दिग्दर्शकांना समर्पित आहे असं वाचल्या वर  तर अपेक्षा अजून उंचावतात ... नक्की काहीतरी वेगळं  असणार असं वाटायला लागतं .. 
कलाकारांचं काम हि अगदी सुंदर आहे..दिग्दर्शन मात्र टुकार आहे .. दिग्दर्शन आहे का असं कधी तरी वाटायला लागतं !  उदा :  दिलीप प्रभावळकर क्रिकेट च्या ग्राउंड वरून धुळीत  फिरून येतो आणि पुढच्या शॉट मध्ये त्याचे काढलेले बूटा चे तळवे स्वच्छ  नव्या बुटा सारखे !! 

ह्या सिनेमा चं कथानक शोधावं लागतं ... मध्यांतरा नंतर एक पाच दहा मिनिटं सिनेमा बरा आहे .. नंतर वैताग आहे .. तो सुद्धा धड नाही ... त्या मनानं पार्श्व संगीत बरं आहे !
मला ह्या सिनेमात तीन चार नवीन कलाकारांचं काम आवडलं .. आनंद इंगळे आतिशा नाईक, पुष्कर श्रोत्री   आणि अतिशा नाईक च्या होणाऱ्या नवर्याचं ज्याने काम केलं आहे त्या कलाकाराचं (बहुतेक त्याचं नाव मनोज जोशी )  !

ह्या सिनेमा ची तुलना मी "गोळाबेरीज" ह्या फ्लॉप सिनेमा शी करणार होतो ! पण गोळा बेरीज बरा असं वाटायला वाव आहे ! 

ह्या सिनेमा मध्ये मला काय आवडलं असं जर सांगायचं झालं तर ... हा फक्त २ तासा चा आहे ! हा सिनेमा मी ज्या मल्टी प्लेक्स मध्ये बघितला त्याचं वातानुकुलन चांगलं होतं त्या मुळे जास्त त्रास झाला नाही. सिनेमा ग्रामीण मराठी प्रेक्षका साठी नक्कीच नाही ... शहरातील सुद्धा विशिष्ट स्तराचे लोकं ह्याचा आनंद जरा तरी घेऊ शकतील !  मराठी असून सुद्धा   "आयटम सॉंन्ग किंवा लावणी" नाही .. हे ह्या सिनेमा चं वेगळेपण म्हणता येईल ! 

मी हा सिनेमा अमोल पालेकर दिग्दर्शन करणार म्हणून बघितला ... ते कुठेच सापडलं नाही !  मक्या नी त्याच्या पेटंट स्टाईल मध्ये केलेला "आंदळकर" .. आनंद इंगळे चा "मन्या "  त्याची बहिण झालेली आतीशा नाईक  ..ह्या कलाकारांनी सिनेमा पूर्ण पडू दिला नाही !

ह्या सिनेमा ची तुलना मी  आय पी एल मधल्या मुंबई इंडियन्स टीम शी करीन  ( किंवा एन बी ए मधील  लॉस अॅन्जलीस लेकर्स शी )  ..फक्त  नावाला दिग्गज मोठे मोठे कलाकार पण ...अपेक्षाभंग !



Tuesday, April 23, 2013

मुंबई !



एका "पुण्यात स्थाईक झालेल्या मुंबईकरा" नी  पाठवलेली कविता ...


मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय
८ रूपयाला वडापाव आणि ...१० रु ला चाय
आला पाहुना घरी तर आखडून बसायच पाय
आणायची ९० रु किलोची चिकन सांगायच
बोकडाच मिळतच नाय
अहो पगार कमी सांगुन इज्जत गमवायची नाय
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय ?



सकाली सकाली ९ वाजता उठायच
बिना तोंड धुता खिडकित यायच
शेजारच्या पोरीला शाळेत जाताना
हळूच म्हणायच हाय
तीने रागात पाहिल तर
म्हनायच सुंदर माझी ताय
मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच रोंग़
नंबर लागला की काय
अहो मुंबई मुंबई मुंबई तित आहे तरी काय



रिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्त
बाइक वाल्यांची किर किर
फेरीवाल्यांची दादागिरी
सड्लेली कोथिम्बिर
कच्च कुच्च वडापाव
आणि लघु शंका असलेली पानी पूरी खाऊन
पर प्रान्तियानाच म्हनाय्च भाय
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय


पान्या साठी पलायच , ग्याससाठी रांगा
कामाला जान्या अगोदरच
फैक्ट्री चा वाजतो भोंगा
धावत धावत टाकाव्या लागतात
ट्रेन मधे ढेंगा
ट्रेन मधल्या गर्दित
आपण असतो आत मधे
आणि बाहेरच लटकतात पाय
दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय ?



साभार "पुण्यात गर्दी वाढवणाऱ्या" मुंबईकरा 

Monday, April 15, 2013

खाऊ गल्ल्या



 पुण्यात तशा बर्याच खाऊ गल्ल्या आहेत .. मी  काही निवडक खाऊ गल्ल्यान मध्ये नित्याने जातो ... टिळक हॉटेल ची खाऊ गल्ली .. खाऊ गल्ली ऑफ  के एन पी ...  आणि "बाल-शिक्षण" खाऊ गल्ली !

टिळक खाऊ गल्ली हि खरी युवक-युवतीं चा अड्डा / कट्टा  .. चोरून बिडी मारणारा कोणी ओळखीचा दिसला तर ते दुर्लक्ष करणं इथे महत्वाचं ! .. ह्या खाऊ गल्लीत कटिंग चहा पासून एसित बसून CAD-B असं सगळं मिळतं .. सदैव गर्दी हे ह्या गल्ली चं वैशिष्ठ्य !  मित्रांच्या गठ्ठा घेऊन इथे जावं ..अजून  एक दोन मित्र इथे काही न काही कारणांनी भेटतातच ! आय पी एल च्या म्याचेस च्या वेळी इथे वेगळीच मजा येते ... ह्या गल्लीतला 'कोल्ड कॉफी' वाला झकास कोल्ड कॉफी बनवतो ... शिवाय फौंटन सोडा .. क्याड बी .. अस्सल कांदा भजी , वडा पाव .. आणि कलिंगड ज्यूस हे इथले खास आकर्षण ! इडली सांबार वैगरे असले अमहाराष्ट्रीय पदार्थ इथे चुकून सुद्धा चाखू नयेत !

इडली सांबार खाण्यासाठी म्हणून जावं तर  बाल शिक्षण च्या खाऊ गल्लीत !

इडली सांबार ची चव हि तशी सकाळीच मजा देते .. संध्याकाळी ते शक्यतो खाऊ नये ..हा अलिखित नियम आहे .. जातीचा "इडली सांबार वाला " हा नियम कायम पाळतो ! वैशाली - रुपाली - वाडेश्वर वैगरे ठिकाणचं इडली सांबार हे वेगळं ..त्याची आणि गाडीवर मिळणाऱ्या इडली सांबर ची कधीच तुलना होत नाही ...किंबहुना ती करूंच नये ..
इडली सांबार चे गाडीवाले त्यांच्या "पेटंट" सांबार च्या चवी मुळे ओळखले जातात !  अश्या  गाडीवरच्या  इडली सांबार वाल्यां कडे खाताना इकडे-तिकडे पडलेल्या केर काचर्या कडे काना डोळा करणं अतिशय महत्वाचं आहे ! नियम १ :  जेवढी गर्दी, सांड पाणी , कचरा जास्त .. तेवढा तो इडली सांबार वाला "अस्सल" 
बाल शिक्षण च्या खाऊ गल्लीतलं इडली-सांबार दोन प्रकारचं .. अस्सल दक्षिणी म्हणजे 'श्रीकृष्ण' चं आणी कोकणी पद्धतीचं गोडसर सांबार हे 'स्वीकार' चं !  शिवाय डोसा ..पराठा .. बर्गर .. कोल्ड कॉफी.. ज्यूस , सॉफ्टी आईस क्रीम  असले वेग-वेगळे स्टॉल्स... काय खाऊ आणि काय नको असं होऊन जातं.. इथली  माझी आवडती  दुकानं म्हणजे ..  इडली , सरबत , पराठा  वाला  !


कमला नेहरू पार्क च्या खाऊ गल्ली ची गम्मत वेगळी .. संध्याकाळी इथे फक्त टाईम पास करणारं पब्लिक असतं .. खरे खवैय्ये हे इथे सकाळीच सापडतात ... दत्त मंदिरा शेजारी साबुदाणा वडा , शेजारी फ्रूट प्लेट / फ्रूट ज्यूस ... एखादा दक्षिण दावणगिरी डोसा .. झालाच तर .. शेवटी एक अस्सल बासुंदी युक्त चहा प्येयल्या शिवाय  खवैय्ये इथून काढता पाय घेत नाहीत .. अगदी संध्याकाळी इथे जायचंच असेल तर भेळ / पाणी पुरी - रगडा पुरी ..पाव भाजी ..आणि वर कोल्ड कॉफी... बास  !


पुण्यातल्या ह्या तीन तरी खाऊ गल्ल्या प्रत्येक पुणेकरानी अनुभवायला हव्या ..  आणि हो .. उगाच ह्यांची तुलना कुठल्या अमुक-तमुक गावच्या तमुक-तमुक गल्ली शी बिलकुल करू नका .. केलीत तर ती उगाच चार चौघात पुणेकराला सांगू नका .. आणि चुकून अशी घोड चूक झाली  तर त्या पुणेकरा कडून "थोडक्या शब्दात"  होणार्या  अपमानाला सहन करण्याची तयारी ठेवा .. दुसरं गत्यंतर तरी काय असणारे म्हणा ?

चला तर ... ह्या उन्हाळ्यात अनुभवा पुण्यातल्या खाऊ गल्ल्या !




Sunday, April 14, 2013

उन्हाळा ..खाणं .. पिणं .. आणि आय पी एल




गुढी पाडवा झाला .. चैत्र शुद्ध प्रतिपदा .. अगदी पाडव्याच्या पहाटे पासूनच उकाड्या ची जाणीव पुणेकरांना झाली ! .. पाडव्या ला ३९ डिग्री पर्यंत तापमान .. पाडव्या च्या गोड जेवणा नंतर वामकुक्षीतून  जाग आली आणि चहा ऐवेजी  पन्हं / कोकम सरबत नाही तर निदान लिंबू सरबत प्यावं असं वाटलं !  उन्हाळा येऊन पोहोचला होता ... त्याचं स्वागत फक्त ए.सी / पंखे / कूलर सुरु करूनच नाही तर  काही मस्त खाद्य पेयांन बरोबर करणं ओघाने आलंच !
ह्या वर्षी ची खाद्य - पेय भटकंती पुण्यात मिळणाऱ्या उत्तम  इडली-सांबार स्टॉल्स ना भेट देऊन करावी असं ठरवलं !  नेहमीचं  वैशाली - रुपाली - वाडेश्वर सोडून काहीतरी वेगळं ! आजची रविवारची सकाळ इडली खाद्य भ्रमंती मध्ये गेली ... ह्या विषयी एक पूर्ण ब्लॉग लिहिण्याची इच्छां आहे ..
गेल्या वर्षी हि मी असाच उन्हाळ्यातल्या खाद्य - पेय भ्रमंती ला निघालो होतो त्या बद्दल  इथे इथे इथे इथेइथे वाचायला मिळेल !  मराठी म्हणलं कि मिसळ खाणे ओघाने आलंच .. वेब वर / पेपरात  ह्या मिसळीन वर असंख्य लेख आहेत .. काही मिसळीन चं नको तेवढं कौतुक आहे ..काहींना त्यांनी खाल्लेल्या मिसळीनचा अभिमान वैगरे आहे .. असो ! मी ह्या वर्षी कुठल्या हि मिसळी बद्दल ब्लॉग वर लिहिणार नाही .. मिसळी मात्र उन्हाळ्यातल्या सकाळी चापणार नक्की !
चैत्र महिन्यात भरपूर भटकंती करून वेग-वेगळ्या पदार्थानचा आस्वाद घेणार आहे .. खवय्यांच्या पुण्यात नवी-नवी खाण्याची ठिकाण रोज निघत असतात ... त्यांचा शोध घेण्याचं काम वैशाख वणव्याच्या आधी  चैत्रात केलेलं बरं !  ..कसे ?  .... शिवाय ..एप्रिल-मे च्या संध्याकाळी ह्या आय पी एल मुळे दुसरं काही करू देत नाहीत !

अधिक काही न लिहिता ..पु लं नी खाण्या विषयी सांगितलेल्या चार ओळी ... अधिक खाण्या विषयी थोडं 



( पुण्याच्या खाद्य संस्कृतीत बसणाऱ्या काही विशेष जागा कोणाला सुचवायच्या असतील तर स्वागत ! )





Sunday, April 7, 2013

परवा भेटला बाप्पा !



परवा भेटला बाप्पा, जरावैतागलेला वाटला
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला
"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"
...
मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"
"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस ?"
"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"
"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"
"काय करू आता माझ्याने manage होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यातमाणसे खुशही होत नाहीत"
"immigration च्या requests ने system झालीये hang
तरीदेखील संपत नाही
भक्तांची रांग"
"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या files नुसत्या वाढतचराहतात"
"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation
management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"
"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?
Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"
"असं कर बाप्पा एक Call Center टाक
तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक regionदेऊन टाक"
"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको
परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला
"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"
"CEO ची position, Townhouse ची ownership
immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"
मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"
अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?
"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही,असं एक तरी बंधन हवं"
"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"
"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?
नेशील मला परत जिथे आहेमाझी माती?"
"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"
"कर्कश्श वाटला तरी हवाढोल-ताशांचा गर्जार
भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"
"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान
देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"
"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, ताळमेळ नाही कसला........


------

अनामिका कडून साभार !

------




Saturday, April 6, 2013

पुणे ! :)


काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न  विचारतात की   "तुम्हाला पुणे का आवडते ?" आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..? 

खालील उतारा एका अस्सल पुणेरी मित्राकडून साभार !

------------

आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो ..आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने , पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही !

उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे ,
किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे,
पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे ( अहो
कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही
ग्यारंटी नसते म्हणून .;),
गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे (
आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर ..;) ,
सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे, जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे,
मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे, पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे ,
लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे, शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे,
अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे, पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे,
'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे , 'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे ,
इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे , 'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे ,
नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या 
रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे ,
सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे ,
आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे,
SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे ,
आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या
पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या
जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे ,
Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे,
कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे, चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,
वैशाली च्या yummy सांभार चे पुणे, रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे,
तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे,
college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे,
Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे ,
पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,
Nike आणि Reebok वाले पण पुणे ,
खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,
आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे,
कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे ,
कॅड बी आणि कॅड एम चे पुणे, सोडा शॉप चे पण पुणे,
अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे,
University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे
लावणार्यांचे' पुणे ,
कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे ( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही ..;) ,
नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे,
खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे,
आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे,
शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले
त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे,
बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे ,
Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे,
सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे,
आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे,
मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे,
पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे ,
आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे,
आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे,
Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे,
शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,
'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे,
मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि... देशाचा defence शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे, 
तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे, बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,
स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे,
सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे,
ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च
केला " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे,
फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे ,
'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !,
०२० चे आणि MH "बारा" चे पुणे,
आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे ,
जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे,
सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे,
शेख, खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे,
पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे,
आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे ,
भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे,
ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर
गाडगीळांचे पुणे,
अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे ,
जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी
जादुगार रघुवीरांचे पुणे ,
अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास
उभे राहणाऱ्या ,
अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६०
पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या
अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे,
भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे,
पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे,
bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे,
आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे ,
काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे ,
बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे,
नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे,
उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे ,
पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे,
घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! ,
शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे , दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे,
कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे , 
फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे,
आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे,
नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे,
आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का
अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे,
रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे,
जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे,
गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे ,
प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे,
लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे,
प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे,
आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता म टा , Mirror वाल्यांचे पुणे
आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे,
दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे
आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे,
दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे,
Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे,
भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे,
ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे,
सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे,
Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...
पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे,
आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे,
अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे,
जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे,
सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे,
Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे,
पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!
पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे,
उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,
Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे,
Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे,
कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे
सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे
घोटाळे बाज खासदारांचे पुणे ,
नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे ,
नवीन दादांचे पुणे, जुन्या भाईंचे पुणे,
बारा महिने २४ तास online असणारे ,
पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे ,
असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !!


आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते !

Friday, April 5, 2013

मुंबईकर , Bombayite .. का पुणेकर !


बंद केलेला ब्लॉग परत सुरु करावासा वाटला .. त्याचं एक कारण म्हणजे अंतर्मुख झाल्यावर आपल्याला आवडणाऱ्या / रुचणारया काही गोष्टी दिसल्या ... " अरे मला हि हेच म्हणायचं होतं " असं वाटलं कि   मग ते किती आणि कोणाला सांगावं असं होऊन जातं .. अश्यावेळी  ब्लॉग हा एकमेव सखा उरतो !

मुंबई ला मी २ वर्ष ..फार पूर्वी राहिलो .. के इ एम हॉस्पिटल ते वरळी सी फेस हा एवढाच काय तो रोजचा प्रवास.. काम करणारे अनेक सहकारी मात्र अगदी कल्याण,डोम्बिवली , ठाणे , विरार वरून परळ ला रोज सकाळी लोकल ट्रेन नी यायचे -जायचे .... म्हणून सुट्टी मिळेल तेव्हा ( शक्यतो शनिवार-रविवार ) मौज म्हणून लोकल ट्रेन नी फिरायचो ! तेव्हा मुंबई चं आकर्षण होतं .. "मुंबईकर" होणं सोपं असलं तरी फार काही आवडण्या सारखं नाही .. पुणेकरा ला तर नाहीच नाही !  आज कित्येक वर्षांनी माझ्या त्या "मुंबई कर " सहकाऱ्यांची भेट झाली .. आणि मुख्य म्हणजे ते आता पुणेकर होण्याचा प्रयत्न करत आहेत !  तेव्हा मी त्यांच्या बरोबर "शिवाजी पार्क" , "आझाद मैदान" , वानखेडे आणि ब्रेबोर्न वर क्रिकेट बघायला जायचो ... आता ते माझ्या बरोबर पी वाय सी , डेक्कन , पुना क्लब , नेहरू स्टेडियम आणि "गहुंजे" ला येतात !  मुंबईकर -पुणेकर  हे वाद  क्रिकेट बघत -बघत चालू ठेवले आहेत !   :)

ह्यावर पुलं नी लिहिलेलं काही ....


मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यात तीनचार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला 'बॉम्बे' म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला 'मुंबई'च म्हणतो. मुंबईत एकदा तुम्ही जन्माला आलात कि मुंबईकर होतच जाता. किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. पण बाहेरून येऊन मुंबईकर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या मराठीमध्ये भूतकाळाला काहीही किंमत नाही हे ध्यानात ठेवा. मुंबईत जसे उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू तसे काळही दोनच,वर्तमान आणि भविष्य. मुंबईला बिचारीला भूतकाळ वगैरे काही नाहीच. तिला फक्त आज आणि उद्या. मुंबईकराला 'शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड काय होता?' यापेक्षा सकाळच्या फास्ट लोकल कुठल्या? याची माहिती अधिक महत्वाची. घड्याळाच्या तासाप्रमाणे मिनिटही मोलाची असतात हे मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही.कारण मुंबईकराचे घड्याळ हे केवळ हाताला बांधलेले नसून त्याच्या नशिबाला बांधलेलं असतं. पण मुंबईमध्ये मुंबईकर होणं हे काहीही सक्तीचं नाही. हा ऐच्छिक विषय आहे.
पुण्यात मात्र पुणेकर होणं हे सक्तीचं आहे.
मुंबईला पुण्यासारखा इतिहास नसेल पण खर्‍या मुंबईकराचं भूतकाळाविषयीचं प्रेम फक्त एकाच बाबतीत उफाळून येतं ते म्हणजे क्रिकेट.कारण मुंबईमध्ये क्रिकेट हा एकच 'खेळ' मानला जातो. इतर शहरात हा खेळ मैदानी वगैरे आहे,पण मुंबईतल्या चाळीच्या ग्यालरीत टेस्ट म्याचेस वगैरे चालतात. शिवाय क्रिकेट समजायला हातात ब्याट-बॉल घेतलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.हि समजूत अगदी चुकीची आहे. क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथे मात्र क्रिकेटच्या इतिहासात तयार असणं अतिशय आवश्यक आहे. अस्सल मुंबईकर ''अवो,ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठशी झाली वो?'' असा प्रश्न विचारून एखाद्या पुणेकराला फेफड आणील.पण त्याला क्रिकेटचा इतिहास विचारा. एखाद्या पुणेकराने बाजीराव,सवाई माधवराव,त्रिंबकी डेंगळे वगैरे नावं फेकावीत ना तसे पी.विठ्ठल,पी.के.नायडू, विजय मर्चंट इथपासून नावं फेकीत फेकीत वाडेकर,सोलकर,हा आपला गावस्कर इथपर्यंत हा हा म्हणता सगळे येऊन पोहोचतात.तेव्हा मुंबईकर व्हायचं असेल तर,'हर हर ती पेशवाई गेली आणि ब्रह्मविद्या गेली' या थाटामध्ये 'हर हर त्या क्वाडल्यामिरर्स गेल्या आणि क्रिकेट खल्लास झाला.' हे वाक्य म्हणावं लागेल.
तात्पर्य, पेशवे आणि टांगे गेले तरी पुण्याचं 'पुणेरीपण' सुटलं नाही पण मुंबईची ट्राम गेली आणि अस्सल मुंबईकर अगदी हळहळला.'साली निदान ती सहा नंबरची ट्राम तरी ठेवायला पाहिजे होती.' या उद्गारामागचा तो काही कळवळा आहे ना तो नव्या मुंबईकराला कळणार नाही.   "



पु. ल. 

(  पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर  )