Friday, April 13, 2012

भोंदुगिरी म्हणावी का वेडेपणा ?



स्वामी आणि महाराज , बाबा लोकांचा सुकाळ चालू आहे.... वेड्या सारखे लोकं यांच्या मागे धावतात ..
कोणाच्या "अंगात " येते आणि ते काही बडबडतात .. त्यातून त्यांचे "भक्त" लोकं काही अर्थ काढून लोकांना सांगतात आणि स्वतः चा खिसा भरून घेतात ... काही शोषण हि करतात ... हे आधुनिक भारतात २१ व्या शतकात चालू आहे ...
गोर -गरीब -अशिक्षित  लोकं हे पूर्वी पासूनच ह्या वेडेपणाला बळी पडत आहेत.. त्यात भर आता "शिक्षित " लोकांची ...कॉम्प्युटर आणि आयटी हि आधुनिकता फक्त नावाला ... भारतीय संस्कृती च्या नावाखाली आयटी वाले लोकच असल्या थेरा पुढे बळी पडताहेत  हे गमतीचे वाटते ...
श्री श्री हा प्रकार पाहिला कि आयटी वाल्या लोकां बद्दल चा सर्व अभिमान गळून पडतो .. श्री श्री हे मुख्यतः आयटी वाले गुरु मानले जातात ... असे अनेक "आयटी" वाले गुरु, दक्षिण भारतात आहेत !
बंगलोर -हैद्राबाद - चेन्नई वैगरे भागात असे अनेक "गुरु -स्वामी - महाराज " आप- आपले आश्रम थाटून बसले आहेत ... आता त्यांच्या "भक्त" लोकांना काय म्हणावं हे कळत नाही .. हे लोकं भक्तान वर काय अशी भुरळ पाडतात हे समजत नाही ... असो . काही वर्षान पूर्वी "नित्यानंद" महाराजाची "कृत्ये" बाहेर आली आहेतच !!
अगदी अमिताभ बच्चन ते सचिन तेंडूलकर असल्या बाबा -स्वामी लोकांना इंडोरस्मेंट करतात   हे आश्चर्य वाटते ! युवराज सिंग ची  आई असल्याच एका "निर्मल बाबा " वर २० लाख रुपये खर्च करून त्याच्या कँसर चा इलाज करून घेत होती !!
भारतीय लोकांचा भोळे-भाबडे पणा का मुर्ख पणा हे समजणं अवघड आहे ... भारतीय संस्कृती च्या नावाने काय वाट्टेल ते चालू आहे हे मात्र खरं. भोळेपणा .... भाबडेपणा ... असुरक्षितता ... कुठे घ्या विषाची परीक्षा ... सगळे करताहेत नमस्कार आपण हि करुया.... हि असली सगळी कारणे देत लोकं स्वामी , बाबा ..महाराज ..असल्या लोकांच्या नादि लागतात .... "सोशल प्रेशर " असे हि म्हणता येईल कदाचित ...
ह्या गोष्टी ला कोणीही अपवाद नाही ... दिल्लीवाले ..नॉर्थ वाले .. साउथ वाले ...मद्रास वाले ..बंगाली .. गुजराती .. मराठी ... अजून कुठल्या भारतातल्या प्रांतातले ...सगळ्यांचे आप-आपले "स्वामी - गुरु - महाराज " ... सगळे ह्या "आंधळ्या - भक्ती " ला लाचारीने स्वीकारत आहेत .. काही तर गर्वाने मिरवीत आहेत !
एक गोष्ट चांगली आहे कि आता हा भोंदूपणा बाहेर तरी आला आहे ... त्यामुळे नवी पीढी जरा तरी विचार करून असल्या "मार्गा" ला लागेल अशी आशा आहे !




   

2 comments:

sharayu said...

आपल्या संकल्पाना सामर्थ्य मिळावे या हेतूने विविध प्रकारच्या आराधना प्रचलित केल्या गेल्या आहेत. कोणी देवाची, कोणी संतांची, कोणी विज्ञानाचा टिळा लावून स्वतःची आराधना करतो. यापैकी एखाद्यालाच वेडा अथवा भोंदू ठरविता येणार नाही.

Tveedee said...

अगदी मान्य !
कृपया गैरसमज करून घेवू नका... मला कुठेही कोणाला दुखवायचा उद्देश्य नाहीये...
पण जर तुम्ही आसपास बघितलत तर असं जाणवेल कि "बाबा-महाराज-स्वामी" अशी प्रकरणे जरा "अति" होत आहेत ...
मी कुठलाच टीळा लावा असं म्हणत नाही ..लावत नाही (विज्ञानाचा सुद्धा )
संस्कृती आणि धर्म ह्या नावाने चाललेला तमाशा - आडंबर बघितलं कि वाटतं हे लोकं भोंदू आहेत का वेडे ?