Thursday, November 8, 2012

ब्लॉग चा पहिला वाढ-दिवस !







आज ८ नावेम्बर ... पु लं चा वाढदिवस ... आणि ह्या  ब्लॉग चा हि  पहिला वाढ-दिवस !

म्हणून ब्लॉग ची पहिली पोस्ट परत एकदा पोस्ट करतो


आता पूर्वी सारखे पुणे उरलं नाही ...
पुण्या चा जाज्वल्य अभिमान असणारे ही आता चारलोकात बिचकून वागतात ... हमारे वक्त पूने में ऐसा नहीं था ..वैगरे वाक्य आपल्या मित्रात टाकुन बघतात ... पण त्या पुढे काही मजाल जात नाही
त्याला कारण ही तसेच आहे... ठेवलय काय आता इथे ... मुंग्यां सारखे लोक बे एरिया मधे गेले... तिकडे सदाशिव , नारायण , शनिवार पेठा वसव्ल्या.. बरोबरंच आहे .. पुढची पीढ़ी तरी सुखात नांदेल ... लोणी साखरेची चव पीनट बटर मधे शोधावी लागतेय एवढच दुख्ख

म्हणतात की आय टी नी पुण्याची प्रगति झाली .... कसली डोम्ब्ल्याची प्रगति ? नुसती गर्दी वाढली ... ती ही बाहेरची... पुण्यात आता मराठी बोलणारा हुड्कावा लागतो ... आपला असा एक म्हणाल तर शपथ ... परकेच जास्त ..
आय टी ने फ़क्त एकच केले ... पुण्याला पौडाच्या जवळ न्हेले !!!!

- अंतु बर्व्याचे स्वगत ( ८ नोव्ह २०११ )


3 comments:

Panchtarankit said...

लिखाणाची शैली आवडली , वस्तुस्थितीचे मार्मिक वर्णन
जे कुळ कायद्यात गमावले ते सिलिकॉन वेलित कमावले.

Tveedee said...
This comment has been removed by the author.
Tveedee said...

धन्यवाद निनाद !
गेल्या ८ नॉव ला पुण्या ला बरेच दिवसांनी पाहिलं तेव्हा ची " रिफलेक्स " प्रतिक्रिया होती ती !
जवळ जवळ सहा महिने देवनागरी तून काहीतरी लिहीत गेलो आणी हा ब्लॉग १२ जून ला बंद केला ! :)
परत एकदा धन्यवाद !