कधी कधी एखाद्या भाषे चं एकदम प्रेम ओथंबून येतं तर कधी एखाद्या भाषे ची / स्टाईल / अॅक्सेंट ची एकदम तिडिक येते.. असं आपल्याला बरेच वेळा अनुभवास येते .. विशेषतः जगभर फिरलेल्या लोकांना हा अनुभव नक्की आला असेल .. एवढंच काय अगदी महाराष्ट्रात फिरलेल्या लोकांना सुद्धा असा अनुभव वेग वेगळ्या प्रांतान मध्ये तेथील अॅक्सेंट बद्दल हि येत असेल !
माझं मराठी वरचं प्रेम एकदम असंच जागं झालं आणि एक मराठी साईट तयार करावी अशी इच्छा झाली .. म्हणून आधी सर्व हयात मराठी साईट्स ची पहाणी केली .. मार्केट रिसर्च स्टाईल नी ! अपोर्चुनिटी , गॅप्स , स्वॉट अनालीसीस असले शब्द नं वापरता .. माझी निरीक्षणे / ओब्सर्वेशन्स इथे मांडत आहे. कुणावर हि वैयक्तिक टीका करण्याचा उद्देश्य नाही. पण साईट्स च्या मालकांना / चालवणाऱ्यांना ह्याचा नक्की उपयोग होईल .
४- ५ साईट्स निवडल्या आणि त्यांच्यावर प्रसिद्ध झालेलं साहित्य , लेख , लेखक , वाचक याचा अभ्यास केला ... ( झेपल्या तेवढ्या कविता सुद्धा वाचल्या !) क्रीटीकल फीडबॅक आणि अनालीसीस करायला सुरवात केली !
मनोगत , मिसळपाव , ऐसी अक्षरे , मीमराठी ह्या साईट्स चा ह्या लेखना साठी अभ्यास केला . मायबोली हि मराठीत ली सर्वात पहिली साईट .. बऱ्याच वर्षान पूर्वी १९९९-२००० मध्ये मी तिचा मेम्बर होतो .. तेव्हा ह्या साईट चं स्वरूप वेगळं होतं .. ती साईट म्हणजे भारता बाहेरील मराठी लोकांचं (विशेष करुन यू एस बेस्ड ) एक प्रकारचं फेसबुक होतं ! नंतर मायबोली बदलत -बदलत आता बर्या पेकी यशस्वी कमर्शयल साईट झाली आहे. ई -कॉमर्स , अॅडस रेवेन्यू हा एन आर आय क्लायंट्स कडून मिळणारा ! जवळ-जवळ प्रत्येकाला माहीत असलेली हि साईट आहे .. अमेरिकेतील प्रत्येक मराठी संमेलना ला ह्यांचा सहभाग असतो. केवळ हौस-मौज म्हणून सुरु केलेली हि साईट .. शिस्तबद्ध वाटचाली मुळे आता यशस्वी झाली आहे. मायबोली चे अनुकरण करत बर्याच साईट्स तयार झाल्या ..काही बंद पडल्या .
ओर्कुट ,फेसबुक आणि ब्लॉग्ज मुळे अनेक हौशी लेखकांना आणि वाचकांना मराठी वाचण्याचे , लिहिण्याचे आणि सोशल इंटरआक्शन चे ऑपशन्स मिळाले .. मराठी साईट्स ची मोनोपली गेली .. एक मोठ्ठा मराठी / देवनागरी लिहिणारा- वाचणारा वर्ग वेबवर ( जालावर ) तयार झाला ! मराठी चान्नल्स सुद्धा सर्व देशात दिसू लागले .. मराठी लोकांना एकमेकांना जोडण्या ची अनेक साधने , उपकरणे , उपलब्ध झाली .. मोबाईल च्या जलद प्रगती मुळे तर आता लोकं जगात कोणाशीही जवळ -जवळ २४ तास "कनेक्टेड" असतात. ह्यामुळे वाचक लेखकांना एक प्रकारे स्वातंत्र मिळालं .. फक्त एका माध्यमावर / साईट वर / मिडीया वर विसंबून नं रहाता मराठी लोकान बरोबर मराठीत "सोशल इंटरआक्शन " करणं सोपं झालं आहे .
अनेक उत्तम मराठी / देवनागरी ब्लॉग्ज , ब्लॉगर्स आहेत .. जे हौशी पायी उत्तम मराठी ब्लॉग्स लिहितात .
मनोगत , मिसळपाव , ऐसी अक्षरे , मीमराठी ह्या "भारत बेस्ड " साईट्स आहेत .. एक प्रकारचा मराठी टच अधिक असलेल्या .. भारतातील / महाराष्ट्रातील मराठी मनाचा जास्त जवळ वाटणाऱ्या . सर्व साईट्स २००७ च्या आस पास सुरु झालेल्या .. म्हणजे जवळ जवळ ५-६ वर्ष झाली !
ह्या प्रत्येक साईट ला स्वतः च असं एक व्यक्ती मत्व आहे ... वेगळेपणा आहे ... २०-३० % मेम्बेर्स हि ह्या पेकी एकाच साईट वर लिहिणारे , एकाच साईट वर चाटींग करणारे , एकाच साईट शी एकरूप / लॉयल ! ६०-८० % लोकं हि ह्या साईट्स वर कॉमन आहेत. दिवसभर ऑफिस मधून इंटरनेट वापरणारी ! भारतात जास्त प्रमाणात लोकं ऑफिस मधूनच इंटरनेट वापरतात .. टाईम पास ला मराठी साईट्स वर लॉगइन होतात !
मनोगत हि बाकीच्या तीन साईट्स पेक्षा जरा वेगळी आहे .. "कर्मठपणा , ताठ बाणा " ह्या शब्दाचं उदाहरण . इथे मराठी च्या शुद्ध स्वरूप , शुद्ध लेखना ला अधिक महत्व आहे . साईट हि अगदी रेखीव .. फालतू पणा तसा न के बराबर ..भाषा हि बर्यापेकी पुस्तकी , अगदी कमी आणि निवडक प्रतिक्रिया .. त्या हि सुसंगंत आणि बिनविरोध ..पद्धतशीर पणे एका मागोमाग एक ..लाईनीत .. एखाद्या कर्मठ , सदाशिव पेठेतल्या सुंदर वाड्यात जावं असं ... कडक नियम ! अवघडल्या सारखं वाटतं इथे पण काही गोष्टी इतक्या नियमात ठेवल्या तरच एक प्रकार ची "आयडेन्टीटी" निर्माण होते .. टी आर पी , मेम्बेर्स च्या नंबर ला अजिबात जास्त भाव नं देणारी ...आणि ..बहुतेक.. म्हणूनच वाचक निर्माण करणारी ! येयचं तर यां .. पण नियम पाळावेच लागतील अशी ! कट्टर ! कंटेंट ची क्वालिटी उत्तम ठेवणारी . एका विशिष्ट प्रकार च्या मराठी लोकान साठी ..बर्यापेकी "इंटल्लेक्चुअल" ..."वेल रीसर्च्ड" कंटेंट. नो-नॉनसेन्स ! एका सच्च्या मराठी प्रेमी , माहीतगार , हौशी-मौजी माणसांनी चालवलेला 'उपक्रम' कळून येतो !
मिसळपाव , ऐसी अक्षरे आणी मीमराठी ह्या साईट्स म्हणजे "सिस्टर /ब्रथर " .. भाऊ -भाऊ बहुतेक "सावत्र " किंवा भाऊबंदकी च्या गुंत्यात अडकलेले ! ड्रुपल च्या एकाच साच्यात तयार झालेले .. वेग-वेगळी प्रकृती असलेले !
मिसळपाव हि मोठी .. बहुतेक भारत बेस्ड पहिली लोकप्रिय साईट ! सामान्य मराठी माणसा ला हवाहवासा वाटणारा वात्रटपणा , मिश्किली, भांडणे , कंपूबाजी , खाणं, गाणं , नाटकं , सिनेमे , इकडच्या तिकडच्या गप्पा ,राजकारण (काहीं साठी "राज" कारण ) , मराठीपणा चा बुलंद आवाज करत सर्वांना सामावून घेणारी साईट ...असा उल्लेख करीन ! काही लोकांच्या मते हि साईट भारत बेस्ड मराठी साईट्स ची माउली आहे. एखाद्या मराठी सिनेमात असावा तसा सर्व मसाला इथे आहे ... लावणी , आयटम सॉंग , सामान्य माणसाला समजणारी - आवडणारी बोली भाषा ... शिवाय .. टवाळ पणा , प्रक्षोभक लेख , भांडणं आणि "मराठीमधून माज" (अस्मिता ह्या नावाखाली ) .. बहुतेक म्हणूनच सर्वात लोकप्रिय मराठी साईट .. भरपूर मेम्बर्स .. टी आर पी साठी उत्तम .. अगदी गावातल्या शाळकरी मराठी मुला पासून परदेशस्थ स्थाईक मराठी माणसा ला काही ना काही देणारी !
ऐसी अक्षरे च्या सर्व क्यार्रेक्टरस्टिक्स वरून हि साईट मध्यम वर्गा चं मराठी जाला वर प्रातिनिधिक रूप वाटते . मराठी साईट्स च्या एका टोकाला मनोगत आणि दुसऱ्या टोकाला मीमराठी ला ठेवलं .. तर .. ऐसी अक्षरे कुठेतरी मध्यावर स्थिर होण्याचा प्रयत्न करताना दिसते . सुबक आणि सुंदर यू आय , दर्जा , माहिती , कंटेंट ! इथल्या मालक -एडिटरस् नी दुसऱ्या कुठल्या तरी साईट वरून फुटून स्वतः चा कंपू बनवला आणि स्वतः च्या "इगो" पायी हि साईट बनवली हे लगेच जाणवतं. इथले एडीटर्स बाकीच्या मराठी साईट्स वर फिरून तिथल्या विषयां च्या जवळ पास चे विषय ह्या साईट्स वर सुरु करतात असं वाटतं .. एडिटर्स खुद्द स्वतः चे लेख बाकीच्या साईट्स वर टाकतात .. बहुतेक टी आर पी साठी ! किंवा स्वतः चा अति-शहाणपणा , विक्षिप्त पणा सगळ्याना दाखवण्या साठी ..किंवा नुसतं नावाच्या प्रसिद्धी साठी (माहीत नाही )
"अति शहाण्या स्युडो-इंटलेक्चुअल्स साठी स्वतः ची लाल दाखवण्या साठी केलेली खटपट " असे एका जाणत्या नी ऐसी अक्षरे चं वर्णन केलं .. बहुतांश वाचक आणी हौशी लेखकांनी ह्या साईट बद्दल त्यांची "निगेटीव" प्रतिक्रियाच व्यक्त केली आहे.
हास्यास्पद गोष्ट म्हणजे एडिटर्स एकमेकांना गुण देऊन बाकीच्या सर्व कॉमेंट्स दाबतात ! येवढं एडिटिंग करण्याची गरज ह्या साईट ला कां लागते हे समजत नाही. एकमेकाची पाठ चोळणे असं काहीसे !
ह्या साईट चा यूजर इंटरफेस हि एक चांगली बाब आहे . एडिटर्स नी पाचकळ पणा सोडला आणि जरा वयस्क पणा अंगीकृत केला तर ह्या साईट ची परिस्थिती सुधारू शकेल. दोन तीन एडिटर्स सोडले तर साईट चांगली आहे.
मीमराठी हि एका माणसाने स्वतः च्या हिम्मतीवर "मराठी साईट तयार करायचीच " म्हणून केली आहे ह्याचे कौतुक वाटते. हि साईट "डेवलपिंग" साईट आहे .. जवळ जवळ १००% मेम्बर हे मिसळपाव साईट चे मेम्बर्स होते ..आहेत. गुण्या गोविंदाने ते दोन्हीही साईट्स वर वावरतात .. साईट वर अस्सल बोली भाषे चा पगडा दिसून येतो. म्हणून सामान्य मराठी माणसाला ती पटकन आपलीशी वाटते ! जर मनोगत ला आपण स्पेक्ट्रम च्या एका टोकाला ठेवलत तर दुसऱ्या टोकाला मीमराठी ला ठेवायला हरकत नाही !
मी मराठी च्या थ्रेडस् वर एक प्रकारचा "कट्टा" फील येतो .. सगळे अगदी मुक्त पणे मनातले लिहीत असतात .. थोडीफार टिंगल टवाळी चाललेली असते .. खरा संवाद बघायला मिळतो .. बोली मराठी भाषा .. सामान्य माणूस वापरतो ती ..जशी वापरतो तशी ..पुस्तकी अजिबात नाही .. एका मेकांचे मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध -ओलावा दिसून येतो.
मी मराठी ला सुधार/ प्रगती करायला खूप वाव आहे .. म्हणून सर्वात जास्त ग्रोथ पोटेन्शियल ह्या मराठी साईट ला आहे असं वाटतं. एकदा चांगला टेक्निकल सपोर्ट मिळाला कि आपोआप बाकीचं जुळून येईल.
ह्या सर्व मराठी संकेत स्थळान वर काही व्यक्ती आणि वाल्लींचा विशेष वावर दिसतो ..त्या लेखकांची विशेष अशी स्टाईल दिसते .. काहींचा विशेष असं अजेंडा दिसतो .. काही विशेष अश्या विषयान वर लिहिताना दिसतात .. काही फक्त टिंगल टवाळी करत सर्व साईट्स वर फिरत .. मजेशीर सार्कास्टिक कॉमेंट्स करत दिवस घालवतात .. काही नुसतेच पेटवा पेटवी करतात .. काही अति भावनिक असतात / भासवतात ! हे सगळे गुण बघायला मिळाले कि मजा वाटते .. मुख्य म्हणजे प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे मराठी माणसाचा भांडण्याचा स्वभाव .. Argumentative Indian ! ह्या लेखाच्या वाचकांनी अश्या हॅन्डल्स , आय डिज , व्यक्तीन बद्दल प्रतिसाद स्वरुपात लिहिलं तर आवडेल !
माझं वैयक्तिक मत विचाराल तर ह्या सर्व साईट्स वाचक म्हणून खूप भावल्या -आवडल्या .. त्यांचा वेगळेपणा समजलं ! सर्व मराठी साईट्स ना अनेक शुभेच्छा ! अगदी मनसे !
No comments:
Post a Comment