मराठी तील दिग्गज कलाकारांना घेऊन ..अमोल पालेकर दिग्दर्शन करणार असं समजलं तेव्हा पासून हा सिनेमा पहायचा हे ठरवलं होतं .. नाव हि जरा हटके ... "वि आर ऑन - होऊन जाऊ द्या" (We are on - Houn Jau dya) .. आज पहिल्या दिवशी पहिला शो पाहिला .. प्रीमियर !
अशोक सराफ , मकरंद अनासपुरे , दिलीप प्रभावळकर , सतीश आळेकर , विजय केंकरे , आनंद इंगळे , मनोज जोशी , उपेंद्र लिमये , आतिशा नाईक , गौतम जोगळेकर , सुहासिनी देशपांडे , शिल्पा नवलकर , सुनील गोडबोले , वंदना गुप्ते , निवेदिता सराफ , समीर चौघुले , पुष्कर श्रोत्री , मनोज जोशी , रमेश भाटकर , सतीश पुळेकर .. हि कलाकारांची यादी पहिली कि सिनेमा कडून एक अपेक्षा निर्माण होते ...
सिनेमा ची सुरवात "सई परांजपे " स्टाईल नी होते ... हा सिनेमा बासुदा व हृषिदा ह्या दिग्गज दिग्दर्शकांना समर्पित आहे असं वाचल्या वर तर अपेक्षा अजून उंचावतात ... नक्की काहीतरी वेगळं असणार असं वाटायला लागतं ..
कलाकारांचं काम हि अगदी सुंदर आहे..दिग्दर्शन मात्र टुकार आहे .. दिग्दर्शन आहे का असं कधी तरी वाटायला लागतं ! उदा : दिलीप प्रभावळकर क्रिकेट च्या ग्राउंड वरून धुळीत फिरून येतो आणि पुढच्या शॉट मध्ये त्याचे काढलेले बूटा चे तळवे स्वच्छ नव्या बुटा सारखे !!
ह्या सिनेमा चं कथानक शोधावं लागतं ... मध्यांतरा नंतर एक पाच दहा मिनिटं सिनेमा बरा आहे .. नंतर वैताग आहे .. तो सुद्धा धड नाही ... त्या मनानं पार्श्व संगीत बरं आहे !
मला ह्या सिनेमात तीन चार नवीन कलाकारांचं काम आवडलं .. आनंद इंगळे , आतिशा नाईक, पुष्कर श्रोत्री आणि अतिशा नाईक च्या होणाऱ्या नवर्याचं ज्याने काम केलं आहे त्या कलाकाराचं (बहुतेक त्याचं नाव मनोज जोशी ) !
ह्या सिनेमा ची तुलना मी "गोळाबेरीज" ह्या फ्लॉप सिनेमा शी करणार होतो ! पण गोळा बेरीज बरा असं वाटायला वाव आहे !
ह्या सिनेमा मध्ये मला काय आवडलं असं जर सांगायचं झालं तर ... हा फक्त २ तासा चा आहे ! हा सिनेमा मी ज्या मल्टी प्लेक्स मध्ये बघितला त्याचं वातानुकुलन चांगलं होतं त्या मुळे जास्त त्रास झाला नाही. सिनेमा ग्रामीण मराठी प्रेक्षका साठी नक्कीच नाही ... शहरातील सुद्धा विशिष्ट स्तराचे लोकं ह्याचा आनंद जरा तरी घेऊ शकतील ! मराठी असून सुद्धा "आयटम सॉंन्ग किंवा लावणी" नाही .. हे ह्या सिनेमा चं वेगळेपण म्हणता येईल !
मी हा सिनेमा अमोल पालेकर दिग्दर्शन करणार म्हणून बघितला ... ते कुठेच सापडलं नाही ! मक्या नी त्याच्या पेटंट स्टाईल मध्ये केलेला "आंदळकर" .. आनंद इंगळे चा "मन्या " त्याची बहिण झालेली आतीशा नाईक ..ह्या कलाकारांनी सिनेमा पूर्ण पडू दिला नाही !
ह्या सिनेमा ची तुलना मी आय पी एल मधल्या मुंबई इंडियन्स टीम शी करीन ( किंवा एन बी ए मधील लॉस अॅन्जलीस लेकर्स शी ) ..फक्त नावाला दिग्गज मोठे मोठे कलाकार पण ...अपेक्षाभंग !
No comments:
Post a Comment