असा हां उन्हाळा ..
सकाळि ८-९ च्या आत सगळी कामं उरकुन दिवस भर एसीत आराम करायला लावणारा..
पुस्तकं वाचत, चरत बसायला लावणारा ..
कधी एकदा सुर्यास्त होतोय ह्याची वाट पहात बसायला लावणारा ..
संध्याकाळी आ पी एल च्या २०-२० मॅचेस बघत बघत झोपुन जायला लावणारा ... उन्हाळा
कुटुंब - मित्र-मैत्रिणींना एकत्र आणणारा ...
मामाच्या गावला नेणारा ..
आजोबांना नातवंडांची किलबिल ऐकवणारा ..
आभाळा येवढं नं मावणारं असं सुख देणारा ...हवा हवासा वाटणारा ... उन्हाळा !
ए सी ..कूलर..पंखे..थंड पाण्याचे माठ..दुपारची शांतता...साम-सूम..वाळा सरबत देणारा..उन्हाळा
करवंद, जाम, जाभळं,ताड गोळे, कैरया, आंबे,फणस,कलिंगडं, आळवं .. देणारा उन्हाळा !
कधी तरी अगदी पुढच्या वर्षी पर्यंत वाट पहात ठेवणारा ... आणि पट-सरशी परत येणारा.. उन्हाळा
कधी तरी अगदी पुढच्या वर्षी पर्यंत वाट पहात ठेवणारा ... आणि पट-सरशी परत येणारा.. उन्हाळा
जिवनाचा प्रवास संथ करणार्या "दुपारीं" चा अनुभव देणारा ..उन्हाळा
सृष्टी, जिवन, आयुष्य ह्या सगळ्या कडे एका नव्या नजरेने बघायला लावणारा... उन्हाळा
नकोसा वाटणारा पण एकांतात गहन विचार करायला लावणारा ... उन्हाळा
बहुतेक हां उन्हाळा लवकरच संपेल .. असा विश्वास देणारा ... उन्हाळा !

आणि आयुष्या ची नवी द्रुष्टी देणारा, हळवं करणारा हि ... उन्हाळा च !
No comments:
Post a Comment