गुढी पाडवा झाला .. चैत्र शुद्ध प्रतिपदा .. अगदी पाडव्याच्या पहाटे पासूनच उकाड्या ची जाणीव पुणेकरांना झाली ! .. पाडव्या ला ३९ डिग्री पर्यंत तापमान .. पाडव्या च्या गोड जेवणा नंतर वामकुक्षीतून जाग आली आणि चहा ऐवेजी पन्हं / कोकम सरबत नाही तर निदान लिंबू सरबत प्यावं असं वाटलं ! उन्हाळा येऊन पोहोचला होता ... त्याचं स्वागत फक्त ए.सी / पंखे / कूलर सुरु करूनच नाही तर काही मस्त खाद्य पेयांन बरोबर करणं ओघाने आलंच !
ह्या वर्षी ची खाद्य - पेय भटकंती पुण्यात मिळणाऱ्या उत्तम इडली-सांबार स्टॉल्स ना भेट देऊन करावी असं ठरवलं ! नेहमीचं वैशाली - रुपाली - वाडेश्वर सोडून काहीतरी वेगळं ! आजची रविवारची सकाळ इडली खाद्य भ्रमंती मध्ये गेली ... ह्या विषयी एक पूर्ण ब्लॉग लिहिण्याची इच्छां आहे ..
गेल्या वर्षी हि मी असाच उन्हाळ्यातल्या खाद्य - पेय भ्रमंती ला निघालो होतो त्या बद्दल इथे इथे इथे इथे व इथे वाचायला मिळेल ! मराठी म्हणलं कि मिसळ खाणे ओघाने आलंच .. वेब वर / पेपरात ह्या मिसळीन वर असंख्य लेख आहेत .. काही मिसळीन चं नको तेवढं कौतुक आहे ..काहींना त्यांनी खाल्लेल्या मिसळीनचा अभिमान वैगरे आहे .. असो ! मी ह्या वर्षी कुठल्या हि मिसळी बद्दल ब्लॉग वर लिहिणार नाही .. मिसळी मात्र उन्हाळ्यातल्या सकाळी चापणार नक्की !
चैत्र महिन्यात भरपूर भटकंती करून वेग-वेगळ्या पदार्थानचा आस्वाद घेणार आहे .. खवय्यांच्या पुण्यात नवी-नवी खाण्याची ठिकाण रोज निघत असतात ... त्यांचा शोध घेण्याचं काम वैशाख वणव्याच्या आधी चैत्रात केलेलं बरं ! ..कसे ? .... शिवाय ..एप्रिल-मे च्या संध्याकाळी ह्या आय पी एल मुळे दुसरं काही करू देत नाहीत !
अधिक काही न लिहिता ..पु लं नी खाण्या विषयी सांगितलेल्या चार ओळी ... अधिक खाण्या विषयी थोडं
( पुण्याच्या खाद्य संस्कृतीत बसणाऱ्या काही विशेष जागा कोणाला सुचवायच्या असतील तर स्वागत ! )
No comments:
Post a Comment