Saturday, May 4, 2013

मराठी ब्लॉग लिहिल्याचं खरं समाधान !



मराठी ब्लॉग लिहिण्याची सुरवात केली तेव्हा जे मनात येईल ते लिहीत गेलो ... त्यामुळे विषय हे मुख्यत्वे खाणं, पिणं , गाणं , पुल , वपु , गदिमा असे सिमित राहिले !
आज एक अतिशय विचित्र पण समाधान कारक अनुभव आला !  सकाळी मित्रा बरोबर मिसळ खायला गेलो होतो .. समोरच्या बाकावर आमच्या सारखेच दोन खवय्ये मित्र मिसळ खायला आलेले होते .. त्यांची तो पर्यंत अज्जिबात ओळख नव्हती ... मिसळ खाता -खाता विषय मिसळी / पुणेरी मिसळी / पुण्यातील खाद्य संस्कृती , खाऊ गल्ल्या ई . ई वर आला ... पुढे ह्या दोघा मित्रांनी आम्हाला बऱ्याच ओळखीच्या खाऊ गल्ल्या / ठिकाणां बद्दल सांगायला सुरवात केली .. त्या मुळे गप्पा अजून रंगल्या .. हे दोघे मित्र नुकतेच  सि.ए (C.A) झालेले होते  आणि पुण्यातील वेग-वेगळ्या ठिकाणी रोज खाद्य-पेय  पदार्थांची मजा लुटत होते हे गप्पांच्या ओघात समजले !  मिसळ - भजी - दही - ताक वैगरे खाऊन झाल्या वर.. आम्ही बिल देऊन बाहेर पडलो ... आमच्या बरोबर हे आमचे नवे दोस्त पण चहा - पाना च्या टपरी पर्यंत पोहोचले ..परत गप्पा सुरु झाल्या .. 
पान खाऊन झाल्यावर ह्या "नव्या"मित्रांनी आम्हाला त्यांच्या खाद्य यात्रेचा गुपित सांगितलं !  तेव्हा माझा  मित्र गुंड्या ..जोर-जोरात हसायला लागला .. मला काही समजेना .. मी विचारलं .. काय झालं येवढं हसायला ? ..मला सुद्धा सांग ... तेव्हा मला आणि माझ्या "नव्या" खवय्या मित्रांना कोडं उलगडलं !
आमचे "नवीन" खवय्ये मित्र सांगत होते कि त्यांनी पुण्यातली चांगली -चांगली खाण्याची ठिकाणं हि एका ब्लॉग वर वाचली आणि ते उन्हाळ्याची खाद्य भ्रमंती करत आहेत ... त्या ब्लॉग चा पत्ता गुंड्या विचारात होता आणि तो समजल्या वर जोर जोरात हसत होता !  त्या ब्लॉग चा पत्ता होता  "अक्षरास हसू नये" ....    veedeeda.blogspot.in   !!!! 

अश्या प्रकारे आम्हाला अजून दोन "नवे" खवय्ये मित्र मिळाले ! मला मनातून अत्यंत आनंद झाला ह्याचं कारण म्हणजे .. आपण जे ब्लॉग वर लिहितो ती माहिती खवय्यांना उपयोगी पडली ! ह्या सुखद भेटी आणि अनुभवा मुळे लगेच हे ब्लॉग पोस्ट लिहायला घेतलं ( मुद्दाम दुपारच्या खाण्यातून वेळ काढून ! )

मराठी ब्लॉग लिहिल्याचं खरं समाधान ! 



( पुण्यातील उन्हाळ्यातल्या  खाण्या - पिण्या विषयी च्या ब्लॉग लिंक्स ह्या  दोन  पोस्ट्स  वर आहेत  



2 comments:

तृप्ती said...

मराठी ब्लॉग लिहिण्याचं समाधान की आपण लिहितोय ते लोकांपर्यंत पोचतंय आणि त्याचा उपयोग होतोय ह्याचं समाधान ? :)

Tveedee said...

दोन्हीही .. पण लिहिण्याचं नाही .. लिहिला ह्याचं असंच म्हणायचं होतं ! लोकान पर्यंत पोहोचतंय हे समजत होतं गुगल एनालीटीक्स च्या विजीटर्स/पेज व्यू आणि स्टॅटस् वरून ! ..पण अशी अचानक कोणाशी अशी भेट व्हावी, ज्यांच्या आवडी निवडी जुळाव्या, आणि आपलं म्हणणं /शब्द त्याने आपल्यालाच सांगावें हे जरा मजेशीर वाटलं !