Monday, April 15, 2013

खाऊ गल्ल्या



 पुण्यात तशा बर्याच खाऊ गल्ल्या आहेत .. मी  काही निवडक खाऊ गल्ल्यान मध्ये नित्याने जातो ... टिळक हॉटेल ची खाऊ गल्ली .. खाऊ गल्ली ऑफ  के एन पी ...  आणि "बाल-शिक्षण" खाऊ गल्ली !

टिळक खाऊ गल्ली हि खरी युवक-युवतीं चा अड्डा / कट्टा  .. चोरून बिडी मारणारा कोणी ओळखीचा दिसला तर ते दुर्लक्ष करणं इथे महत्वाचं ! .. ह्या खाऊ गल्लीत कटिंग चहा पासून एसित बसून CAD-B असं सगळं मिळतं .. सदैव गर्दी हे ह्या गल्ली चं वैशिष्ठ्य !  मित्रांच्या गठ्ठा घेऊन इथे जावं ..अजून  एक दोन मित्र इथे काही न काही कारणांनी भेटतातच ! आय पी एल च्या म्याचेस च्या वेळी इथे वेगळीच मजा येते ... ह्या गल्लीतला 'कोल्ड कॉफी' वाला झकास कोल्ड कॉफी बनवतो ... शिवाय फौंटन सोडा .. क्याड बी .. अस्सल कांदा भजी , वडा पाव .. आणि कलिंगड ज्यूस हे इथले खास आकर्षण ! इडली सांबार वैगरे असले अमहाराष्ट्रीय पदार्थ इथे चुकून सुद्धा चाखू नयेत !

इडली सांबार खाण्यासाठी म्हणून जावं तर  बाल शिक्षण च्या खाऊ गल्लीत !

इडली सांबार ची चव हि तशी सकाळीच मजा देते .. संध्याकाळी ते शक्यतो खाऊ नये ..हा अलिखित नियम आहे .. जातीचा "इडली सांबार वाला " हा नियम कायम पाळतो ! वैशाली - रुपाली - वाडेश्वर वैगरे ठिकाणचं इडली सांबार हे वेगळं ..त्याची आणि गाडीवर मिळणाऱ्या इडली सांबर ची कधीच तुलना होत नाही ...किंबहुना ती करूंच नये ..
इडली सांबार चे गाडीवाले त्यांच्या "पेटंट" सांबार च्या चवी मुळे ओळखले जातात !  अश्या  गाडीवरच्या  इडली सांबार वाल्यां कडे खाताना इकडे-तिकडे पडलेल्या केर काचर्या कडे काना डोळा करणं अतिशय महत्वाचं आहे ! नियम १ :  जेवढी गर्दी, सांड पाणी , कचरा जास्त .. तेवढा तो इडली सांबार वाला "अस्सल" 
बाल शिक्षण च्या खाऊ गल्लीतलं इडली-सांबार दोन प्रकारचं .. अस्सल दक्षिणी म्हणजे 'श्रीकृष्ण' चं आणी कोकणी पद्धतीचं गोडसर सांबार हे 'स्वीकार' चं !  शिवाय डोसा ..पराठा .. बर्गर .. कोल्ड कॉफी.. ज्यूस , सॉफ्टी आईस क्रीम  असले वेग-वेगळे स्टॉल्स... काय खाऊ आणि काय नको असं होऊन जातं.. इथली  माझी आवडती  दुकानं म्हणजे ..  इडली , सरबत , पराठा  वाला  !


कमला नेहरू पार्क च्या खाऊ गल्ली ची गम्मत वेगळी .. संध्याकाळी इथे फक्त टाईम पास करणारं पब्लिक असतं .. खरे खवैय्ये हे इथे सकाळीच सापडतात ... दत्त मंदिरा शेजारी साबुदाणा वडा , शेजारी फ्रूट प्लेट / फ्रूट ज्यूस ... एखादा दक्षिण दावणगिरी डोसा .. झालाच तर .. शेवटी एक अस्सल बासुंदी युक्त चहा प्येयल्या शिवाय  खवैय्ये इथून काढता पाय घेत नाहीत .. अगदी संध्याकाळी इथे जायचंच असेल तर भेळ / पाणी पुरी - रगडा पुरी ..पाव भाजी ..आणि वर कोल्ड कॉफी... बास  !


पुण्यातल्या ह्या तीन तरी खाऊ गल्ल्या प्रत्येक पुणेकरानी अनुभवायला हव्या ..  आणि हो .. उगाच ह्यांची तुलना कुठल्या अमुक-तमुक गावच्या तमुक-तमुक गल्ली शी बिलकुल करू नका .. केलीत तर ती उगाच चार चौघात पुणेकराला सांगू नका .. आणि चुकून अशी घोड चूक झाली  तर त्या पुणेकरा कडून "थोडक्या शब्दात"  होणार्या  अपमानाला सहन करण्याची तयारी ठेवा .. दुसरं गत्यंतर तरी काय असणारे म्हणा ?

चला तर ... ह्या उन्हाळ्यात अनुभवा पुण्यातल्या खाऊ गल्ल्या !




3 comments:

Tveedee said...

धन्यवाद (खवय्ये ) वाचकहो ! :) एका दिवसात ११२४ वाचकांनी हि पोस्ट वाचली ..आता खाऊ गल्ल्यान मध्ये अजून गर्दी होणार नक्की !! :)

Tveedee said...

Very happy to see that this post has been viewed by over 10,000 viewers in last 21 days ! It is the most viewed post of my blog. 82% viewers are from India and 16% from US. Almost 94% of the viewer traffic was sourced by marathiblogs.net

Thanks to all for the overwhelming response and special thanks to marathiblogs.net for directing the traffic to the blog.

Tveedee said...

गाड्यां वर मिळणाऱ्या इडली-सांबार च्या यादीत दोन नावं राहून गेली ...

१) एफ सी रोड ला वाडेश्वर च्या समोरच्या गल्लीत .. आर्यभूषण प्रेस / गुप्ते हॉस्पिटल गल्लीत ..असलेली इडली-डोसा ई ची गाडी .. इथलं इडली सांबर विशेष आहे !

२) मंजुनाथ इडली स्टॉल.. उम्ब्र्या गणपती चौका जवळ..फक्त सकाळी मिळणारी इडली ..एकदम मस्त ..दोन इडल्या एकत्र केलेली मोठ्ठी इडली .. चविष्ट सांबार आणि चटणी !