आज मराठी भाषा दिवस ... माझ्या मनातलं सगळं ..थोडक्यात विदेश यांच्या लेखन प्रपंच वरील चार ओळीतून व्यक्त होत आहे...
सुरेख उत्तम वा वा छान
म्हणत वाहवा करू -
जमेल तेथे मायमराठी
आपण जवळ करू !
मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस !
मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया !
मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक !
मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब !
मराठी नेता गरजला- व्हेरी गुड !
मराठी जनता म्हणाली- गुड, छान !
भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी
आज मराठी भाषा दीन
आज मराठी भाषा दिन !
1 comment:
धन्यवाद. सुंदर.
गर्वाने बोला.. आम्ही मराठी
Post a Comment