" गोळा बेरीज " पाहून आलो ... प्रतिक्रिया देणे अवघड वाटते आहे .. पण प्रयत्न करणार आहे...
आतुरतेने ह्या सिनेमा ची वाट पाहत होतो ... त्या मुळे थोडंसं हिरमुसले पण जाणवतंय .
अपेक्षा भंग झाला असं म्हणणं बरोबर नाही ...कारण पुलंचं साहित्य इतकं वजनदार आहे कि वेळ फुकट गेला असं वाटलं नाही.
राव साहेबांच्या भाषेत सांगायचे झाले तर " ह्या क्षितीज झारापकर नावाच्या दिग्दर्शकाने उगाचच उंटाच्या बुडाला शिवण्याचा प्रयत्न केला आहे. सुमार दर्जा च्या ह्या दिग्दर्शकाने हे शिवधनुष्य का हाताळले हे कोडं आहे. त्याने कुठल्या तरी चांगल्या गुरु कडे जाऊन त्यांचे पाय धरावे आणि शिक्षणास सुरवात करावी हे बरे ! "
दोन आयटम नंबर ह्या सिनेमात टाकण्याची काय गरज होती हे समजले नाही. त्यांचा दर्जा हि टुकार होता..
एखाद्या शाळकरी मुलांनी पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे काय असं सारखं सिनेमा पहाताना वाटत रहातं. कास्टिंग बद्दल बोलायचे झाले तर मूळ लेखकांनी वर्णन केलेल्या व्यक्ती रेखा आणि निवडलेले कलाकार ह्यात खूप फरक वाटला.
सुबोध भावे ने केलेला नंदा प्रधान आवडला.
सखाराम गटणे हा "एकारांत" बावळट आणि उंच वाटतो ... तो तसा पुलं नि व्यक्ती रेखान्कला नाहीये. तो गहूवर्णी , बुटका हवा होता.
सतीश शहा नि पेस्तोन काका हे गुजराती शेठ सारखे रंगवले आहेत.. त्यांना एक ब्रिटीश वळण हवे होते.. शिवाय ते जरा बारीक हवे होते. ( मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या सारखं )
हरितात्या तर एकदम काहीच्या काहीच वाटले ... टोटल फेल
दिलीप प्रभावळकर सारखा जेष्ठ कलाकार हि अंतू बरवा सारखी व्यक्ती रेखा रंगवताना कमी पडला असे जाणवते .. त्याचे बोलणे मुंबई च्या "कोकणी" चाकरमान्यान सारखं वाटतं .. खरा अंतू बरवा हा "कोकणस्थी " थाटाने बोलतो ...
मोहन आगाशे म्हातारा म्हणून ठीक आहे पण "चितळे मास्तर " म्हणून बरा वाटला नाही. चितळे मास्तरांचा सोज्वळ पण ह्या माणसाच्या चेहर्या वर दिसत नाही.
राव साहेब हे व्यक्ती चित्र काही जमले नाही असं मला वाटलं...केवळ चांगल्या डायलॉग मुळे ते निभावून गेले आहे.. गदिमा मात्र छान वाटले !
नारायणा चे काम चांगले झाले आहे .. बबडू हि मस्त झाला आहे. नामू परीट हि दाद घेवून जातो !
प्रसाद ओक , पुष्कर श्रोत्री हि छोटेसे रोल छान करून जातात.
पण सिनेमात सुसूत्रता जाणवली नाही... एखादी डॉक्यूमेंटरी म्हणावी एवढी हि सुसूत्रता ह्या दिग्दर्शकाला साधता आली नाही.
पार्श्व संगीत हे फार वाईट होते आणि भडक होते ... तांत्रिक दृष्ट्या हे संगीत काही डायलॉग खाऊन टाकत होते. एकंदरीत संगीत हे लो बजेट आणि हौशी लोकांनी केले असावे असे वाटते.
पुल प्रेमींच्या एकंदर अपेक्षा खूप असणे साहजिक होते, त्या अपेक्षा भंग होणे हे हि समजू शकतो ...पण हा सिनेमा अपेक्षा भंग होण्या च्या पायरीवर हि पोहोचू शकला नाही असे मला वाटले.