कुठेतरी पुणेरी पाटी वाचली ... " वेळेला चहा लागतो ... चहाला वेळ नसते " .. पुण्यातील "अमृततुल्या" न मधून मिळणार्या चहाचे असेच आहे...थंडी पडली कि याची "गोडी" अधिक जाणवते , पण अस्सल पुणेकराला कडक उन्हात सुद्धा एक घोट घेतल्या वर आराम वाटतो.
अमृततुल्य हि फक्त पुण्यात आहेत ...ते इथल्या संस्कृती चा एक भाग आहेत. अमृततुल्य हे चहा चे 'दुकान' नाही कि 'हॉटेल ' हि नाही... ते चहाचे मंदिर आहे..
इथल्या साध्या चहा ला वेलची चा एक अस्सल स्वाद आहे.. थोडा आल्याचा आस्वाद आहे... साखर अंमळ आहे .. दुध बेताचेच असले तरी पुरेसे आहे.. खरा अमृततुल्य चहा हा हाच .. इंग्रजी चहाच्या जाती शी याचा काही संबंध नाही. स्पेशल चहा हा गुंड्या भाऊंच्या भाषेत सांगायचा झाला म्हणजे ..चहाची बासुंदी .. ती भुर्के घेत बशीत ओतूनच प्यावी .. घोट घेत घेत .. कट चहा मित्रांच्या घोळक्यात बसून घेण्यात खरी मजा. म्हणूनच खरे जीवाचे मित्र हे नेहमी बरोबर चहा 'घेतात' , 'पीत' नाहीत !
पुण्याच्या पेठान मधून अजून हि अमृततुल्य संस्कृती टिकून आहे. अस्सल अमृततुल्य हे 'चहाच्या दुकानां ' पासून आपले अस्तित्व वेगळं करून उभं आहे.. इथे आत शिरतानाच मालक गल्ला सांभाळत ,चहा करता करता आपलं स्वागत करतो. चहा करण्याची , तो उकळत ठेवण्याची , दुध ढवळण्याची , साखरेचा डाव उंची वरून चहात ओतण्याची , मांडी वर छोटा पितळी खलबत्ता घेवून वेलदोडे कुटण्याची , एका विशिष्ट पद्धतीने तो चहा एका पांढऱ्याशुभ्र कापडातून गाळण्याची, पितळी झारी तून चहा ची धार कपात ओतण्याची ... ह्या वल्लभाची एक लकब आहे. अस्सल अमृततुल्यांची ची खासियत म्हणजे त्यांच्या मागे एक " ..श्वर " असतो ... "नर्मदेश्वर" , मयुरेश्वर , जबडेश्वर , असे अनेक श्वर पुण्याच्या पेठांची खाद्य-पेय संस्कृती टिकवून आहेत . स्वतः ची अशी एक लकब आणि स्वतःची अशी एक चव जपणारी अमृततुल्य पुण्यात खंबीर पणे सेवाव्रत आहेत..
चहा बद्दल सांगीतिक भाषेत सांगायचं कारण हेच कि प्रत्येक शास्त्रीय संगीताच्या बैठकीत चहा हा असतोच .. त्या शिवाय त्या बैठकीला मजा येत नाही ...
मला चहा यमना सारखा वाटतो .. अमृततुल्य ... दिवसाच्या कुठल्याही प्रहराला गोडंच .. गोडवा हाच याचा रस ..

नाहीतरी काय .. मना साठीच ह्याची खरी गरज ..पोटाच्या भुकेचं आणि या अमृततुल्याचं कुठे आहे घेणं देणं ?
2 comments:
'चहा यमनासारखा...' कल्पना आवडली!!! पण आता 'अमृततुल्य'चं रुपडं पहिल्यासारखं राहिलं नाहीये. परवाच कर्वे रोडला जुन्या एका स्पॉटवर अपेक्षेने गेलो आणि हात हलवत परत आलो...
अमृततुल्य हि पेठां मध्ये ... कर्वे रोड ला कुठे ?
Post a Comment