‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषि रक्त आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा’
कवी आरती प्रभू अर्थात चिं. त्र्यं. खानोलकर ( ८ मार्च १९३० - २६ एप्रिल १९७६ ).
त्यांचे बालपण कुडाळ आणि बागलांची वाडी या निसर्गरम्य ठिकाणी व्यतीत झाले. १९५९ साली ते मुंबईला आले. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा सर्वच साहित्यप्रकारांत लक्षवेधी लेखन केले. कवितालेखनासाठी त्यांनी ‘आरती प्रभू’ हे नाव घेतले. आरती प्रभू हे नाव कसे घेतले याला पाश्र्वभूमी आहे. त्यांनी ‘प्रभू-खानोलकर’ या आडनावातील ‘प्रभू’ हे आडनाव घेतले. घरी त्यांना ‘रघुनाथ’ या नावाने हाक मारीत. त्या नावातील रोमन लिपीतील ‘आर’ आणि ‘टी’ ही अक्षरे त्यांनी घेतली आणि त्यातून ‘आरती प्रभू’ हे नाव तयार केले.
कवी आरती प्रभू हे शालेय जीवनापासूनच कविता लिहीत. ‘बालार्क’ या शालेय हस्तलिखितात ‘पुष्पकुमार’ या नावाने त्यांनी काही कविता लिहिल्या. ‘सत्यकथा’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘शून्य शृंगारते’ ही त्यांची कविता ‘आरती प्रभू’ या नावाने प्रसिद्ध झाली. त्यांनी लिहिलेल्या ‘कोंडुरा’, ‘रात्र काळी घागर काळी’ या कादंबऱ्या मराठीतील महत्त्वाच्या कादंबऱ्या मानल्या जातात. त्यांचे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक ‘रंगायन’ या नामवंत संस्थेने रंगमंचावर आणले. १९६२ मध्ये त्यांचा ‘दिवेलागण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘चानी’ ही त्यांची कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की व्ही. शांताराम यांनी त्यावर आधारित त्याच नावाने चित्रपट काढला. खानोलकरांनी ‘कालाय तस्मै नम:’ आणि ‘असाही एक अश्वत्थामा’ ही नाटकेही लिहिली.
काही काळ त्यांनी आकाशवाणीत मंगेश पाडगांवकर यांच्यासोबत काम केले. श्री. पु. भागवत, मंगेश पाडगांवकर, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर या दिग्गज मंडळींनी त्यांना नेहमीच प्रोत्साहनपर साथ केली.
१९७८ साली आरती प्रभूंच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहाला अत्यंत प्रतिष्ठेचा असा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. परंतु हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही.
भावगीतांमध्ये ‘ती येते आणिक जाते..’, ‘ये रे घना, ये रे घना..’, ‘समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते..’ ही त्यांची गाणी अफाट लोकप्रिय झाली. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी ते गेले. (२६ एप्रिल १९७६) मराठी विकी पृष्ठ :
कविवर्य वसंत बापट यांच्या शब्दात..
‘तुम्ही जीव लावला मैत्र आपुले जुने केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे हे एकच आता अखेरचे मागणे ही मैफल अपुली अखंड चालो अशी आम्ही जाणारच की कधीतरी पटदिशी..’ ----------------------------------------------------------------------------------------
कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
अंत झाला अस्ता आधी , जन्म एक व्याधि वेदानांचे गाणे म्हणजे पोकळं समाधि देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी हारापरी हौताम्य हे त्याच्या गळी साजे कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ? दीप सारे जाती येथे विरून विझूनं वृक्ष जाती अन्धारात गोठुन झडून जिवानाशी घेती पैजा घोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ? कशासाठी उतरावे तम्बू ठोकुन कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगातात येथे कुणी मनात कुजुन
तरी कसे फुलंतात गुलाब हे ताजे कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
आनंद झाला म्हणून असो किंवा वेदना, दुखः झालं म्हणून असो ... माणूस वेग-वेगळे आवाज काढून ते व्यक्त करतो .. भावना व्यक्त करण्या साठी एक अत्यंत प्रभावी साधन आपल्याला मिळालेले आहे... शोकात बुडालेल्या एखाद्या व्यक्तीला म्हणूनच मनसोक्त रडण्या करता प्रवृत्त करण्यात येते ... आज काल हास्य क्लब सुद्धा तसेच काही करतात .. भावनांना प्रभावी पणे वाट करून देण्या साठी "आवाज करणे " हा मार्ग आपण नकळत अवलंबतो. आपण ढोल वाजवून, संगीत वाद्य वाजवून आनंदाच्या भावना व्यक्त करतो.
लहान बाळ, कुत्र्या - मांजरी चे छोटे पिल्लू हि आपल्या भावना व्यक्त करण्या साठी वेग-वेगळे आवाज करते.
शब्दात व्यक्त न होऊ शकणार्या अनेक प्रकारच्या भावना शोधण्या साठी , विविध रस ( विरह , व्याकुळता , कारुण्य इ ) जाणून घेण्या साठी , हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची सुरवात झाली असावी, बहुतेक असेच संगीत हि उत्पन्न झाले असावे....
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात सर्व रस आहेत ( विभत्स व विनोद रस सोडून ). अनेक शास्त्रीय संगीतकार आपल्या गायना च्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नती करून घेतात. हे तंत्र बहुतेक स्वतः चा , स्वतः च्या भावनांचा शोध करून घेत ..पुढे त्या माध्यमातून अनंत ( unknown ) शोधण्यात उपयोगी असावे.
मला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत स्वतः च्या भावना शोधण्या साठी खूप उपयोगी वाटते ( going from known to unknown), शब्दात न मांडता येणारे अनेक भाव केवळ स्वरांच्या माध्यमातून आपल्याला स्वतः ची ओळख करून देतात.
उदाहरण देयचे झाले तर दरबारी कानडा हा राग रोद्र रस , आर्जव व कारुण्य रस एकत्र उत्पन्न करणारा आहे आणि त्यातील अति कोमल गांधार हा स्वर हि गंभीरता उत्पन्न करतो .. हा अति कोमल गांधार स्वर गजेंद्र मोक्ष कथेतील , हत्तीच्या विव्हळण्यातून उत्पन्न झाला असे म्हणतात.
पुरिया धनाश्री चे असेच .. फक्त आलापी सुद्धा प्रभावी पणे संध्याकाळची आर्तता, कारुण्य आणि विचित्र हवी हवीशी ओढ .. पटकन दाखवून जाते ... कोमल रिषभ आणि धैवाताची हि जादू आहे
असेच तोडी रागाचे आहे ..सर्व कोमल स्वर घेणार्या रागाचा अति कोमल रिषभ हा स्वर शांत वातावरण निर्माण करतो , मनाला शीतलता देतो ...
मियां तानसेन दीपक राग गाऊन झाल्यावर प्रचंड अस्वस्थ झाला , मनाचा तोल ( nervous breakdown ) गेल्या मुळे.. फिरत फिरत दक्षिणे कडे आला.. तिथे गुजरी प्रांतात त्याला दोन गुजरी मुली पाणी भरत काही गाताना ऐकू आल्या.. त्यांचे गायन ऐकून तानसेन चे मन शांत झाले .. परत तो स्वस्थ झाला , गाऊ लागला आणि उत्तरे कडे गेला ! हीच ती गुजरी तोडी !
अशा अनेक आख्याईका आहेत ..
एक मात्र खरं... तानसेन असो वा कानसेन संगीताची संवेदना सारखीच !
कुठेतरी पुणेरी पाटी वाचली ... " वेळेला चहा लागतो ... चहाला वेळ नसते " .. पुण्यातील "अमृततुल्या" न मधून मिळणार्या चहाचे असेच आहे...थंडी पडली कि याची "गोडी" अधिक जाणवते , पण अस्सल पुणेकराला कडक उन्हात सुद्धा एक घोट घेतल्या वर आराम वाटतो. अमृततुल्य हि फक्त पुण्यात आहेत ...ते इथल्या संस्कृती चा एक भाग आहेत. अमृततुल्य हे चहा चे 'दुकान' नाही कि 'हॉटेल ' हि नाही... ते चहाचे मंदिर आहे.. इथल्या साध्या चहा ला वेलची चा एक अस्सल स्वाद आहे.. थोडा आल्याचा आस्वाद आहे... साखर अंमळ आहे .. दुध बेताचेच असले तरी पुरेसे आहे.. खरा अमृततुल्य चहा हा हाच .. इंग्रजी चहाच्या जाती शी याचा काही संबंध नाही. स्पेशल चहा हा गुंड्या भाऊंच्या भाषेत सांगायचा झाला म्हणजे ..चहाची बासुंदी .. ती भुर्के घेत बशीत ओतूनच प्यावी .. घोट घेत घेत .. कट चहा मित्रांच्या घोळक्यात बसून घेण्यात खरी मजा. म्हणूनच खरे जीवाचे मित्र हे नेहमी बरोबर चहा 'घेतात' , 'पीत' नाहीत ! पुण्याच्या पेठान मधून अजून हि अमृततुल्य संस्कृती टिकून आहे. अस्सल अमृततुल्य हे 'चहाच्या दुकानां ' पासून आपले अस्तित्व वेगळं करून उभं आहे.. इथे आत शिरतानाच मालक गल्ला सांभाळत ,चहा करता करता आपलं स्वागत करतो. चहा करण्याची , तो उकळत ठेवण्याची , दुध ढवळण्याची , साखरेचा डाव उंची वरून चहात ओतण्याची , मांडी वर छोटा पितळी खलबत्ता घेवून वेलदोडे कुटण्याची , एका विशिष्ट पद्धतीने तो चहा एका पांढऱ्याशुभ्र कापडातून गाळण्याची, पितळी झारी तून चहा ची धार कपात ओतण्याची ... ह्या वल्लभाची एक लकब आहे. अस्सल अमृततुल्यांची ची खासियत म्हणजे त्यांच्या मागे एक " ..श्वर " असतो ... "नर्मदेश्वर" , मयुरेश्वर , जबडेश्वर , असे अनेक श्वर पुण्याच्या पेठांची खाद्य-पेय संस्कृती टिकवून आहेत . स्वतः ची अशी एक लकब आणि स्वतःची अशी एक चव जपणारी अमृततुल्य पुण्यात खंबीर पणे सेवाव्रत आहेत.. चहा बद्दल सांगीतिक भाषेत सांगायचं कारण हेच कि प्रत्येक शास्त्रीय संगीताच्या बैठकीत चहा हा असतोच .. त्या शिवाय त्या बैठकीला मजा येत नाही ... मला चहा यमना सारखा वाटतो .. अमृततुल्य ... दिवसाच्या कुठल्याही प्रहराला गोडंच .. गोडवा हाच याचा रस ..
नाहीतरी काय .. मना साठीच ह्याची खरी गरज ..पोटाच्या भुकेचं आणि या अमृततुल्याचं कुठे आहे घेणं देणं ?
पहाटे ४ वाजता हि प्ले लिस्ट आपल्या आय - पॉड वर सुरु करा ... दुसर्या दिवशी पहाटे ४ पर्यंत फक्त ऐकत रहा ! माझ्या आवडीचे काही कलाकार आणि राग. सोहनी राग रात्रीचा राग आहे असे म्हणतात पण तो मला पुरिया च्या जवळपास वाटतो म्हणून मी तेव्हा संध्याकाळच्या आधी ऐकतो !
अहिर भैरव - संजीव अभ्यंकर , अश्विनी भिडे देशपांडे भटियार - संजीव अभ्यंकर बैरागी- हरी प्रसाद चौरसिया बसंत मुखारी - हरी प्रसाद चौरसिया , सुलतान खान , मालिनी राजूरकर सलग बरारी - राजन साजन मिश्र , आरती अंकलीकर टिकेकर बिलासखानी तोडी - आरती अंकलीकर टिकेकर , अश्विनी भिडे देशपांडे, मालिनी राजूरकर मियां कि तोडी- रशीद खान , बिस्मिल्लः खान , मालिनी राजूरकर गुजरी तोडी - गणपती भट , अश्विनी भिडे देशपांडे, अनुप जलोटा सारंग - बिस्मिल्लः खान , मालिनी राजूरकर , गीता जावडेकर , सी आर व्यास मुलतानी - जसराज , संजीव अभ्यंकर मधुवंती - संजीव अभ्यंकर , अश्विनी भिडे देशपांडे दिन कि पुरिया - संजीव अभ्यंकर रामकली - जितेंद्र अभिषेकी , संजीव अभ्यंकर गुणकली - संजीव अभ्यंकर सोहनी - उपेंद्र भट , रशीद खान , मालिनी राजूरकर पुरिया - संजीव अभ्यंकर , जितेंद्र अभिषेकी , रशीद खान श्याम कल्याण- श्रीनिवास जोशी , संजीव अभ्यंकर
पुरिया धनाश्री - जसराज , संजीव अभ्यंकर , रशीद खान
मारवा - वसंतराव देशपांडे , राहुल देशपांडे , हरिप्रसाद चौरसिया श्री - गणपती भट , भीमसेन जोशी ललत - दिलशाद खान, भीमसेन , आरती अंकलीकर टिकेकर बसंत - संजीव अभ्यंकर , राहुल देशपांडे , राजन साजन मिश्र झिंझोटी- राजन साजन मिश्र , अश्विनी भिडे देशपांडे यमन कल्याण - संजीव अभ्यंकर ,राजन साजन मिश्र,अमजद अली खान,अनुप जलोटा,उपेंद्र भट भीमपलास - मालिनी राजूरकर , संजीव अभ्यंकर , बिस्मिल्लः खान मधुकौंस - संजीव अभ्यंकर, गणपती भट , मालिनी राजूरकर ,
वसंतराव देशपांडे बिहाग - संजीव अभ्यंकर , अश्विनी भिडे देशपांडे, मालिनी राजूरकर मालकौंस - रशीद खान , दिलशाद खान , अनुप जलोटा जयजवंती - राजन साजन मिश्र बागेश्री - मुकुल शिवपुत्र, कौशिकी चक्रवर्ती , रशीद खान , संजीव अभ्यंकर जोग - संजीव अभ्यंकर , अश्विनी भिडे देशपांडे जोग कंस - रशीद खान ,राहुल देशपांडे दरबारी कानडा - राजन साजन मिश्र , अमीर खान , मुन्नावर अली खान अडाणा - शौनक अभिषेकी , राजन साजन मिश्र विभास - मालिनी राजूरकर भैरवी - भीमसेन जोशी , अनुप जलोटा
I am watching a long line of small red ants in my balcony carrying very tiny piece of sweet towards some destination ! I am not sure if I should be killing these ants who got attracted to a piece of sweet which I must have dropped accidentally last night sometime while having dessert ?!
Its been almost 15-20 minutes , I am watching these creatures diligently carrying a very tiny piece of sweet(GuL poli) , and these 50-100 creatures must have carried it half a feet or so...
I am in great dilemma. Do I have right to kill these innocent creatures , when I myself have invited them by shabbiness of dropping a piece of sweet ?
For now I am just going to let them do their job as nature intends them to do. I will return late evening to see their progress. Hopefully they would disappear to the place they came this morning from ,in search of sweetness, carrying with them their fruit out of their hard work of the day !!