Wednesday, November 30, 2011

पुणेरी मिसळ



पुण्यात राहणारा माणूस , मग तो कुठल्या ही जाती , धर्म पन्था चा असला तरी त्या त्या जाती धर्म पंथात तो वेगळा असतो तसच काही मिसळी च आहे... त्यामुळे पुण्यात मिळणार्या "कोल्हापुरी " मिसळीला सुद्धा एक वेगळेपण आहे... खरा मिसळी चा भोक्ता कधी ही कुठल्या दोन मिसळिंची तुलना करत नाही ... हां अलिखित नियम आहे ... "कोल्हापुरी तिखट मिसळ हीच खरी मिसळ" असले बाण मारणारे करवीर हे खरे "मिसळ धर्मच" विसरतात असे मला कुठे तरी वाटत आले आहे ... असो
पुणेरी मिसळी चा आस्वाद घेण्या साठी पुण्याच्या पेठांतुन वाट काढत भक्ति भावानी , दाटी-वाटीत बसून शांत पणे चविनी खाणे आत्मसात करणे आवश्यक आहे ... तरच त्या मिसळकारणी अन्नपुर्णेचा आशीर्वाद लाभतो
पुण्याचा मिसळीत मानाचे स्थान नारायण पेठेतल्या मुन्जाबाच्या बोळातल्या अण्णा बेडेकरांच्या "बेडेकर टी स्टॉल" चा ... गुळचट ब्राम्हणि पद्धतीची... लाल तर्री ची भाजी असणारी ही मिसळ नाका डोळ्यातून पाणि काढातेच पण दुसर्या दिवशी सकाळी ही आठवते
तुळशी बागेतील श्री कृष्ण मिसळीची खासियत म्हणजे कोकणी पद्धतिची लसणीच्या फोडणी चा तवंग असलेली रस्सा भाजी
शनिवार /नारायण पेठेतील श्री मिसळ अशीच.... रस्साभाजित आणि मिसळीवर ओला नारळ कोकणी थाट दाखवणारी
टिळक रोड वरचा रामनाथ म्हणजे खरा "पुणेरी - कोल्हापुरी "... कोल्हापुरी जाज्वल्य अभिमान असणारे ही रामनाथ ची मिसळ खाल्ल्या वर गप्प बसतात असा अनुभव पुणेकरान्ना आहे ....
मिसळी च्या ह्या मिरावणुकित रास्ता पेठे तील वैद्य उपहार गृह , कुमठेकर रस्त्या वरील चंद्रविलास , कर्वे रोड वरील काटा किर्र अश्या मिसळी आपले वेगळे पण दाखवून जातात

पुण्यात राहून जर एखाद्या मिसळ भोक्त्या ला ह्या सर्व मिसळींचे आस्वाद घेता आले नाहित तर त्याने काही तरी पाप केले असावे असे समजवयास हरकत नाही !

3 comments:

Tveedee said...

मिसळी च्या मिरवणुकीत एक मिसळ चुकून राहून गेली .. ती म्हणजे "अस्सल पुणेरी" दुकानाचा नमुना असलेल्या 'प्रभा विश्रांती गृहा" ची मिसळ ! बटाटे वडे , साबुदाणा वडा आणि पूर्वी मिळत असलेली गोड नारळाची कचोरी... ह्या बरोबर हि मिसळ जरा खुलते ! अधिक इथे पहा .. http://veedeeda.blogspot.in/2012/03/blog-post_29.html

विशाल विजय कुलकर्णी said...

मंगला सिनेमाच्या जवळ WolksWagan च्या शोरूम समोर एक मिसळीची गाडी असते, कधी जमल्यास ती टेस्ट करून पाहा. मस्तक असते

Tveedee said...

ह्या लिस्ट मध्ये आज (२३.६.१३) .. पुण्यातील अजून एक मिसळ टाकत आहे .. मंगला टॉकीज जवळची "मामांची करंट मिसळ " .. ह्या मिसळी ला हि जवळ जवळ ३२ वर्षा चा इतिहास आहे ! स्वस्त - चवदार - वाल्यु फॉर मनी अशी मिसळ .. रिक्षावाल्यांची एकदम आवडती मिसळ आहे !