Wednesday, November 30, 2011

पुणेरी मिसळ



पुण्यात राहणारा माणूस , मग तो कुठल्या ही जाती , धर्म पन्था चा असला तरी त्या त्या जाती धर्म पंथात तो वेगळा असतो तसच काही मिसळी च आहे... त्यामुळे पुण्यात मिळणार्या "कोल्हापुरी " मिसळीला सुद्धा एक वेगळेपण आहे... खरा मिसळी चा भोक्ता कधी ही कुठल्या दोन मिसळिंची तुलना करत नाही ... हां अलिखित नियम आहे ... "कोल्हापुरी तिखट मिसळ हीच खरी मिसळ" असले बाण मारणारे करवीर हे खरे "मिसळ धर्मच" विसरतात असे मला कुठे तरी वाटत आले आहे ... असो
पुणेरी मिसळी चा आस्वाद घेण्या साठी पुण्याच्या पेठांतुन वाट काढत भक्ति भावानी , दाटी-वाटीत बसून शांत पणे चविनी खाणे आत्मसात करणे आवश्यक आहे ... तरच त्या मिसळकारणी अन्नपुर्णेचा आशीर्वाद लाभतो
पुण्याचा मिसळीत मानाचे स्थान नारायण पेठेतल्या मुन्जाबाच्या बोळातल्या अण्णा बेडेकरांच्या "बेडेकर टी स्टॉल" चा ... गुळचट ब्राम्हणि पद्धतीची... लाल तर्री ची भाजी असणारी ही मिसळ नाका डोळ्यातून पाणि काढातेच पण दुसर्या दिवशी सकाळी ही आठवते
तुळशी बागेतील श्री कृष्ण मिसळीची खासियत म्हणजे कोकणी पद्धतिची लसणीच्या फोडणी चा तवंग असलेली रस्सा भाजी
शनिवार /नारायण पेठेतील श्री मिसळ अशीच.... रस्साभाजित आणि मिसळीवर ओला नारळ कोकणी थाट दाखवणारी
टिळक रोड वरचा रामनाथ म्हणजे खरा "पुणेरी - कोल्हापुरी "... कोल्हापुरी जाज्वल्य अभिमान असणारे ही रामनाथ ची मिसळ खाल्ल्या वर गप्प बसतात असा अनुभव पुणेकरान्ना आहे ....
मिसळी च्या ह्या मिरावणुकित रास्ता पेठे तील वैद्य उपहार गृह , कुमठेकर रस्त्या वरील चंद्रविलास , कर्वे रोड वरील काटा किर्र अश्या मिसळी आपले वेगळे पण दाखवून जातात

पुण्यात राहून जर एखाद्या मिसळ भोक्त्या ला ह्या सर्व मिसळींचे आस्वाद घेता आले नाहित तर त्याने काही तरी पाप केले असावे असे समजवयास हरकत नाही !

Tuesday, November 8, 2011

आता पूर्वी सारखे पुणे उरलं नाही ...

आता पूर्वी सारखे पुणे उरलं नाही ...
पुण्या चा जाज्वल्य अभिमान असणारे ही आता चारलोकात बिचकून वागतात ... हमारे वक्त पूने में ऐसा नहीं था ..वैगरे वाक्य आपल्या मित्रात टाकुन बघतात ... पण त्या पुढे काही मजाल जात नाही
त्याला कारण ही तसेच आहे... ठेवलय काय आता इथे ... मुंग्यां सारखे लोक बे एरिया मधे गेले... तिकडे सदाशिव , नारायण , शनिवार पेठा वसव्ल्या.. बरोबरंच आहे .. पुढची पीढ़ी तरी सुखात नांदेल ... लोणी साखरेची चव पीनट बटर मधे शोधावी लागतेय एवढच दुख्ख

म्हणतात की आय टी नी पुण्याची प्रगति झाली .... कसली डोम्ब्ल्याची प्रगति ? नुसती गर्दी वाढली ... ती ही बाहेरची... पुण्यात आता मराठी बोलणारा हुड्कावा लागतो ... आपला असा एक म्हणाल तर शपथ ... परकेच जास्त ..
आय टी ने फ़क्त एकच केले ... पुण्याला पौडाच्या जवळ न्हेले !!!!

- अंतु बर्व्याचे स्वगत ( ८ नोव्ह २०११ )